पुणे

सय्यद असीम वकार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

CD

नवी दिल्ली, ता. २ (पीटीआय) : ‘‘भाजपला सत्तेतून हटवायचे असे केवळ तोंडदेखले म्हणायचे आणि प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाला सत्तेतून हटवू इच्छिणाऱ्यांशीच लढायचे, अशी ‘एमआयएम’ची भूमिका आहे,’’ असा आरोप ‘एआयएमआयएम’चे माजी राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद असीम वकार यांनी बुधवारी केला. वकार यांनी नुकताच प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
वकार यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयात उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेंद्र पाल गौतम, प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वकार यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम म्हणाले, ‘‘विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात शिक्षण, रोजगार, विद्यार्थी, महिला आणि वंचित घटकांशी संबंधित प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी प्रत्येक घटकाचा आवाज ठामपणे मांडत असून प्रत्येक आघाडीवर सरकारला सातत्याने सावध करत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन विविध पक्षांतील ज्येष्ठ नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करत आहेत.
‘केवळ काँग्रेसकडून लढा’
वकार म्हणाले की, देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे भाजपच्या या राष्ट्रविरोधी सरकारला सत्तेतून हटवून जनहितासाठी काम करणारे धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करणे. मात्र, अनेक वर्षे ‘एआयएमआयएम’मध्ये राहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की, हे केवळ तोंडदेखले म्हटले जात आहे. मात्र प्रत्यक्षात आपण आपला भाजपशी न लढता आपण काँग्रेस, समाजवादी पक्ष अशा भाजपला सत्तेतून हटवू इच्छिणाऱ्या प्रत्येक पक्षाशीच आपण लढत आहोत. ‘‘प्रत्यक्षात देशभरात भाजपशी कोणी लढत असेल, तर ते काँग्रेस, राहुल गांधी आहेत,’’ असा दावा त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : सकल मराठा समाजाकडून लातूर जिल्हा बंदची हाक; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा

Maratha Reservation : पाण्याच्या टाकीवर चढून पेट्रोलची बाटली हातात घेत उपोषण; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन

Lohgaon News : संसाराची जबाबदारी सांभाळत जिद्दीने अभ्यास; धुपखेड्याच्या सुनेची नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड

Marathi News Live Updates : शिवसेना पक्षाच्या वादावर सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद नेमका काय ?

'तो फोटो चोरला अन् आईने खूप मारलं' जितेंद्र जोशी बालपणीची आठवण सांगताना म्हणाले...'मामाने पट्ट्यानं आणि आईनं चपलेनं...'

SCROLL FOR NEXT