ganesh bidkar Esakal
पुणे

Ganesh Bidkar News : "लई मस्ती आली का? चुपचाप २५ लाख रुपये दे"; भाजप नेते बिडकरांना फोनवरून धमकी

अक्षय बडवे

पुणे : भाजप चे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले गणेश बिडकर यांना शिवीगाळ करत अनोळखी नंबर वरुन धमकी देत खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. गणेश बिडकर यांनी या प्रकरणी स्याबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रामनवमी उत्सव सुरू असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल करून मराठी आणि हिंदी भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. "लई मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे" अशी खंडणी देखील मागितली.

पैसे नाही दिले तर तुझी बदनामी करू असे देखील या अनोळखी व्यक्तीने बिडकर यांना सांगितले. काही दिवसांपूर्वी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार ताजा असतानाच हा प्रकार घडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीसांनी वटारलं तर तुमचं साम्राज्य एक दिवसात उद्ध्वस्त होईल, चंद्रकांतदादांचा सतेज पाटलांना इशारा

पुण्यात NCRA कर्मचाऱ्यावर प्रश्नपत्रिका लीक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; Official Secrets Act अंतर्गत कारवाई

ज्या धनपत अंकल यांनी जुळ्या बाळांना दिले होते आशीर्वाद, तेच आता जगात नाहीत; दिव्यांका त्रिपाठी भावुक

Diwali Padwa and Balipratipada: बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा एकाच दिवशी का साजरा करतात? जाणून घ्या यामागचं धार्मिक महत्त्व

Latest Marathi News Live Update: गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटलांचा विजय - महाडिक

SCROLL FOR NEXT