Crime 
पुणे

पिंपरीतील शिवसेनेच्या माजी शाखाप्रमुखाचा मुळशीत खून; पुरावे नष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न

सकाळ वृत्तसेवा

माले (पुणे) : मुळशी खुर्द (ता.मुळशी) येथे हॉटेल दिशाज जवळील रस्‍त्‍याकडेला बुधवारी (ता.१०) सकाळी एक मृतदेह आढळून आला. खून करुन पुरावा नष्‍ट करण्‍याच्‍या हेतूने हा प्रकार करण्‍यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विजय सर्जेराव सुर्वे (वय ४०, रा. चिंचवड, पुणे) असे मयताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता.१०) सकाळी मुळशी खुर्द येथील दिशाज हॉटेलच्‍याजवळील रस्‍त्‍याकडेला एक व्‍यक्‍ती पडलेला दिसून आला. दारू पिऊन कोणी पडले असेल म्हणून ग्रामस्‍थांनी दुर्लक्ष केले; परंतु पालथ्‍या पडलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या आसपास रक्‍त दिसून आल्‍याने ग्रामस्‍थांनी याबाबत पोलिसांना कळवले. मृत व्यक्तीची ओळख पटल्यानंतर सगळीकडे चर्चा सुरू झाली. मृत विजय सुर्वे यांनी पिंपरी-चिंचवड येथील मोहननगरचे शिवसेनेचे शाखाप्रमुख पद भूषवले होते. 

पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, भालचंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, मृगदीप गायकवाड, पोलिस हवालदार शंकर नवले, बीट अमंलदार सचिन शिंदे, पोलिस नाईक चंद्रशेखर हगवणे आदींनी घटना स्थळावर जाऊन पाहणी केली. मयत व्‍यक्‍तीच्‍या डोक्‍यात जबर मारहाण करुन खून केला असून पुरावा नष्‍ट करण्‍यासाठी मृतदेह फेकण्‍यात आला असल्‍याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT