Former Cooperative Minister Harshvardhan Patil criticized opposition party
Former Cooperative Minister Harshvardhan Patil criticized opposition party 
पुणे

खोट्या शपथा घेवून, लबाड बोलून विकास होत नाही - हर्षवर्धन पाटील 

राजकुमार थोरात

वालचंदनगर - ‘ खोटे बोला,पण रेटून बोला ’ असा विरोधकांचा एककलमी कार्यक्रम असून लबाड बोलून, खोट्या शपथा घेवून तालुक्याचा विकास होत नसल्याची सडकून टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.

अंथुर्णे (ता. इंदापूर) जवळील उखळमाळ येथे सामाजिक सभागृहाच्या भुमीपूजनाच्या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, राजेंद्र गायकवाड, अर्बन बॅंकेचे संचालक सत्यशिल पाटील, डॉ. नंदकुमार सोनवणे, वसंत जाधव उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, गेल्या साडेतीन- चार वर्षापासुन तालुक्याचा विकास खुंटला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीचे पाणी वेळेवर मिळत नाही, खडकवासल्याच्या सणसर कटमधून एक थेंब ही पाणी आले नाही, लोणीच्या एमआयडीसी मध्ये नव्याने एक प्रकल्पही आणता आला नाही. उलट या ठिकाणचे प्रकल्प बंद पडत असून गुंडगिरी वाढली असून उद्योजकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून नव्याने एक अनुदानित तुकडी सुरु करण्यामध्ये आली नाही. 

तालुक्यातील युवकांचा नोकरीचा प्रश्‍न गंभीर झाला अाहे. तालुक्याच्या शैक्षणीक, औद्योगिक व कृषी विकास खुंटला अाहे. याउलट आम्ही मंजूर केलेल्या कामांचे उद्घाटने करण्यात आघाडीवरती आहेत. सध्या तालुक्यातील नागरिकांच्या घरी जावून सांत्वन करुन खोटी आश्‍वासने देण्याचे काम सुरु अाहेत. आमच्या काळामध्ये तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांना २२४० एकर जमीन केवळ एक रुपया एकराने दिली.यावेळी पंचशिल तरुण मंडळाच्या वतीने पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्य्रकमाचे सुत्रसंचालन भरत बोराटे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन राजु भोसले,मनोज रणदिवे, विकास खरात, अमित कांबळे, राहुल मोरे, बंडू काबंळे, राजू कांबळे, सागर मोटे, संतोष मोरे यांनी केले होते.

उखळमाळचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करु : पाटील
यावेळी येथील नागरिकांनी घरकुलाचा प्रश्‍न अनेक वर्षापासुन रखडला आहे. लोकप्रतिनिधीनीं घरकुल मंजूर झाल्याची पत्र देेवून आमची फसवणूक केली आहे. असे सांगितल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी घरकुल व दोन गुंठे जमीनीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महसूलमंत्री व शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून प्रयत्न करण्याचे अाश्‍वासन दिले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT