पुणे

माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचे निधन

सकाळवृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : माजी नगरसेवक उदयकांत राणोजी आंदेकर यांचे अल्पशा आजाराने जहांगीर रुग्णालयात  निधन झाले. ते  52 वर्षाचे होते. शिवभक्त बंडू अण्णा आंदेकर यांचे धाकटे बंधू व नगरसेविका लक्ष्मीताई आंदेकर यांचे ते पती होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच ते सुमारे 15 वर्ष महानगरपालिकेत सदस्य म्हणून कार्यरत होते. राजकीय प्रवासात अपक्ष, शिवसेवा व राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. समाजामध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ते  सुपरिचित होते.

विशेषतः दिन दलित व दुर्बल घटकांना ते सतत आर्थिक साहय्य करीत असत. अल्प कालावधीत त्यांनी बांधकाम व्यवसायात नावलौकिक मिळवले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मोठ्या प्रमाणात त्यांच्या हितचिंतकांनी निवास्थान व स्मशानभूमी येथे धाव घेतली. परंतु प्रशासकीय कारणास्तव स्मशानभूमीत जाण्यासाठी शोकाकुल जनतेला पोलिसांनी मज्जाव केला. त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली. नानापेठेतील व्यापारी व  व्यावसायिकांनी आंदेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्वयंस्फूर्तपणे दुकाने बंद करून शोक व्यक्त केला.

त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, दोन मुली, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. विद्यमान नगरसेवक वनराज आंदेकार यांचे ते चुलते होते. तसेच नगरसेविका स्व. राजश्री आंदेकर यांचे ते दीर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinesh Phogat: विनेश फोगाट प्रकरणात अचानक मोठं वळण! हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात कुस्ती संघटना थेट सुप्रीम कोर्टात, नेमकं काय घडलं?

Jalna Water Crisis : पाण्यासाठी मोजावे लागतायत 50 रुपये! नदीकाठची गावं ऐन उन्हाळ्यात तहानलेली; जालन्यातील धक्कादायक वास्तव समोर

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आदेश

Monsoon 2026 : शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी! यंदा मान्सूनचा पाऊस कमीच होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज जारी

FDA Action: राज्यात एफडीएची धडक कारवाई! ३३ जणांना अटक; २७ आस्थापनांना लावले सील

SCROLL FOR NEXT