Ravindra Singh Jadhav Passed Away esakal
पुणे

Ravindra Singh Jadhav : माजी राष्ट्रपतींचे स्वीय सचिव, नाशिकचे माजी विभागीय आयुक्त रवींद्रसिंह जाधव यांचे Heart Attack ने निधन

१९८० मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून ते शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर जाधव यांनी राज्यभर विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम केले.

सकाळ डिजिटल टीम

प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना त्यांचे स्वीय सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली.

पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांचे स्वीय सचिव, नाशिकचे माजी विभागीय आयुक्त रवींद्रसिंह जालमसिंह जाधव (वय ७३) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी जळगाव (Jalgaon) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जाधव हे त्यांच्या मूळगावी टाकरखेड (या. मातोळा, जि. बुलढाणा) येथे गेले असताना मंगळवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी प्रतिभा आणि सुचेता, शीतल आणि शुभांगी या तीन मुली, जावई असा परिवार आहे.

१९८० मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून ते शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर जाधव यांनी राज्यभर विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम केले. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना त्यांचे स्वीय सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यापूर्वी नाशिक महसूल विभागाचे विभागीय आयुक्त, पुणे आणि अमरावती विभागाचे राज्य माहिती आयुक्त, अमरावतीचे जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी पदांवर त्यांनी काम पाहिले.

विभागीय आयुक्त असताना त्यांनी अनेक लोकाभिमुख प्रकल्प राबविले. राज्य माहिती आयुक्त म्हणून त्यांनी अधिकाधिक प्रकरणे निकालात काढली. त्यांच्यावर सायंकाळी जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा आज ९ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता जळगाव येथील त्यांचे "तेजोमय" प्लॉट नं. २, अंबिका हाउसिंग सोसायटी , न्यू भगवान नगर, राम नगर जवळ, गिरनार वॉटर टॅंक, जळगाव या निवासस्थानावरुन निघणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT