Anant-Dixit 
पुणे

‘सकाळ’चे माजी संपादक अनंत दीक्षित यांचे निधन

सकाळवृत्तसेवा

पुणे - ज्येष्ठ पत्रकार, ‘सकाळ’चे माजी संपादक अनंत भगवान दीक्षित (वय ६७) यांचे सोमवारी (ता. ९) सायंकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता. ११) सकाळी नऊ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या मागे पत्नी अंजली, विवाहित कन्या अस्मिता आणि जावई असा परिवार आहे. 

दीक्षित गेली काही वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते. त्यांना सातत्याने डायलेसिस करावे लागत होते. सोमवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. कन्या अस्मिता परदेशातून परतणार असल्याने अंत्यसंस्कार बुधवारी होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. 

दीक्षित यांनी ‘सकाळ’मध्ये कोल्हापूर आणि पुण्यात संपादकपदी दीर्घकाळ काम केले. समकालिन राजकारण, शिक्षण, कला आणि समाजकारणाचे जाणते भाष्यकार अशी त्यांची ओळख होती. साहित्य हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. पुण्याच्या आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची धाकटी मुलगी अमृता हिचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. तिने लिहिलेल्या ‘परतीचा पाऊस’ या पुस्तकाचे प्रकाशन पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत त्यांनी केले होते. 

एखाद्या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी, मुद्देसूद विश्‍लेषण; तसेच शैलीदार वक्तृत्व हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. सामान्यांच्या वेदना मांडणारा संपादक, अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय स्तरातून दुखवटा व्यक्त करण्यात येत आहे. 

दीक्षित मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील भालगावचे. सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण बार्शीमध्ये झाले. वाचन आणि पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी सोलापूरमधून साडेचार दशकांपूर्वी पत्रकारितेस सुरुवात केली. सोलापूरमधील ‘विश्‍व समाचार’ आणि ‘संचार’मध्ये काही काळ काम केल्यानंतर ते ‘सकाळ’मध्ये कोल्हापुरात रुजू झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : बैलगाडा शर्यतीत थरार! बैलाची घोडीवरून उडी; मोठा अपघात टळला

Karjat Accident: कर्जत रस्त्यावर अपघात, सात विद्यार्थी जखमी; अकलुज येथील वॉटरपार्कला जात हाेते अन् अचानक काय घडलं!

"शाळानंतर 18 सिनेमे केले पण रिलीज झाले नाहीत" अंशुमनने व्यक्त केली खंत; म्हणाला..

कोस्टल कॉरिडॉरमुळे नकाशा बदलणार! अटल सेतू आता अलिबागकडे वळणार; नवा मार्ग कसा असणार?

Pune Crime: नारायणगाव येथे बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या तरुणास अटक, तलवारी जप्त व खंजीर जप्त..

SCROLL FOR NEXT