court sakal
पुणे

Bitcoin Case : माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांचा जामीन फेटाळला

बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील यांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला.

सकाळ वृत्तसेवा

बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील यांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला.

पुणे - बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) (Bitcoin) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात (Fraud Case) अटकेत असलेले माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (Ravindranath Patil) यांचा जामीन अर्ज (Bail Form) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला. (Reject) त्यामुळे पाटील यांनी आता जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

या प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी नेमलेला सायबर तज्ञ पंकज प्रकाश घोडे (वय ३८, रा. ताडीवाला रोड) आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (वय ४५, रा. बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनी या प्रकरणातील डिजिटल डेटाचा गैरवापर केला आहे, असे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. दरम्यान हा गुन्हा सत्र न्यायालयाकडून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग झाल्यानंतर पाटील यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी विरोध केला. आरोपींच्या वॉलेटचे पासवर्ड अद्याप मिळालेले नाहीत. तसेच गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नाही. इतर आरोपींचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे पाटील याला जामीन झाल्यास तपासात अडथळा येवू शकतो, असा युक्तिवाद ॲड. जाधव यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE च्या नव्या नियमाने विद्यार्थ्यांवर संकट? त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्ट संतापले, केंद्र सरकारला नोटीस!

'मराठी असून हिजाब का घातला?' अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पोस्ट Viral

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Latest Marathi News Live Update : सीएनजी दरवाढीने टॅक्सी चालक हवालदिल, कमाईपेक्षा खर्च वाढल्याने दुहेरी संकट

Miraj Crime News : दारू पिताना वाद, नशेत अविवाहित मित्राच्या डोक्यात जबर मारहाण; दिवसाढवळ्या मिरजेत रक्तरंजित घटना

SCROLL FOR NEXT