Former Junnar MLA Balasaheb Dangat met Shiv Sena chief Uddhav Thackeray 
पुणे

आढळरावांविरोधात शिवसेनेचं ‘दांगट’ कार्ड?

जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर - जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला, अशी चर्चा रंगली. मात्र, त्यांनी सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे दांगट यांच्या प्रवेशाबद्दल सूर उमटत आहे.

बाळासाहेब दांगट हे सन १९९० व सन १९९५ मध्ये जुन्नर तालुक्याचे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी होते. त्यांचा सन २००४ मध्ये पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे त्यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चा रंगली आहे. त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला तर तालुक्यातील शिवसेनेला बळकटी मिळेल, अशी चर्चा आहे.

दरम्यान, याबाबत दांगट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. बंधू बाजीरावशेठ दांगट यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी, ‘बाळासाहेबांचे काय चालले आहे?’ अशी विचारणा केली होती. दांगट व ठाकरे परिवाराचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे ‘मातोश्री’वर जाऊन आम्ही त्यांना भेटलो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ठाकरे यांच्या भेटीवेळी बाळासाहेब दांगट यांच्यासोबत बाजीराव दांगट, नीलेश दांगट व बबनराव थोरात आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT