Former Minister of State Bala Bhegade 
पुणे

केंद्राची कृषी विधेयके शेतकऱ्यांच्या फायद्याची

गजेंद्र बडे

पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली तीनही कृषी विधेयके ही शेतकऱ्यांच्या फायद्याची आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्री करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे, असे मत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केले आहे.

या सर्व विधेयकांना कॉंग्रेस आणि अन्य शेतकरीविरोधी संघटना तीव्र विरोध करत आहेत. यामुळे ही विधेयके मंजूर झाल्यापासून शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांनी शंका न बाळगता आणि विरोधकांकडून पसरविल्या जात असलेल्या अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन भेगडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

भेगडे म्हणाले, या विधेयकांचा शेतमालाच्या किमान पायाभूत किंमतीची काहीही सबंध नाही. भविष्यातही ही किमान पायाभूत किंमत दिली जाणार आहे. यामुळे एक राष्ट्र एक बाजार स्थापन होण्यास मदत होणार आहे. शेतकरी कोणत्याही वेळी त्यांनी केलेल्या करारापासून बाहेर पडू शकतो, अशी तरतूद त्यात आहे.

यासाठी कसलाही दंड आकारला जाणार नाही. याउलट या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना आता आडत द्यावी लागणार नाही. खासगी व्यक्ती शेतकऱ्यांबरोबर शेतमाल खरेदीचे करार करू शकतील. मालाच्या विक्रीसाठी होणारा वाहतूक खर्च वाचू शकेल.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT