पुणे

देश संक्षिप्त

CD

पूर्व भारत

माजी प्राचार्यांविरुद्ध
खटल्यास मंजुरी
कोलकाता ः आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरोधात खटला चालविण्यास पश्चिम बंगाल सरकारने मंजुरी दिली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यपालांनी भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि पीएमएलए अंतर्गत कारवाईस मान्यता दिली. घोष यांच्याविरोधात प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचे गैरकृत्य आढळल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
---
तृणमूल नेत्याविरोधात
गोंधळप्रकरणी तक्रार
कोलकाता : फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांच्या दौऱ्याचे आयोजक सतद्रू दत्ता यांनी तृणमूल काँग्रेस नेते आणि माजी क्रीडामंत्री अरूप विश्वास यांच्यासह चौघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळासाठी त्यांना जबाबदार धरत आपल्याला बळीचा बकरा बनविल्याचा आरोप दत्ता यांनी केला. या कार्यक्रमानंतर दत्ता यांना अटक झाली होती व त्यांना ३८ दिवस तुरुंगात राहावे लागले होते.
-----
मानव तस्करीप्रकरणी
दोघांना अटक
छैबासा : झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील एका हॉटेलमधून सहा अल्पवयीनांसह ३६ जणांची सुटका करण्यात आली असून मानव तस्करीप्रकरणी गुजरातमधील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. या लोकांना गुजरातमध्ये वेठबिगार म्हणून कामासाठी नेले जात असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. आरोपींवर मानव तस्करी, बालमजुरी आणि बालकांच्या शोषणासंबंधी विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
----
मध्य भारत

भोजशाळेत
‘महाविजय महोत्सव’
धार (मध्य प्रदेश) ः पुरातत्व खात्याने भोजशाळा संकुलात हिंदूंना निर्बंधमुक्त पूजा करण्याची परवानगी दिल्यानंतर हिंदू संघटनांनी येथे ‘महाविजय महोत्सव’ साजरा केला. देवी वाग्देवीच्या पूजेसह अखंड ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने भोजशाळा-कमाल मौला मशीद संकुल हे सरस्वती देवीचे मंदिर असल्याचा निकाल दिल्यानंतर हा उत्सव आयोजित करण्यात आला.
-----
पश्चिम भारत

आईनेच मुलीला
ॲसिड पाजले
जयपूर ः राजस्थानमधील खैरथल-तिजारा येथे एका महिलेने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला ॲसिड पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर अवस्थेतील या बालिकेवर रूग्णालयात उपचार सुरू असून ती व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या तोंड आणि नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना घडली तेव्हा वडील कामावर गेले होते आणि मुलगी आईसोबत घरी होती. या प्रकरणामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
--
उत्तर भारत

जागांपेक्षा विजयाला
प्राधान्य : अखिलेश
लखनौ ः समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आगामी निवडणुकांमध्ये मित्रपक्षांसोबतची आघाडी कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. ‘जागावाटप नव्हे, तर विजय महत्त्वाचा’ हा फॉर्म्युला पुढेही लागू राहील, असे ते म्हणाले. ‘अमर उजाला’च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी समाजवादी पक्षाने नेहमीच मित्रपक्षांचा फायदा होईल अशी भूमिका घेतल्याचा दावा केला.
---
सप प्रवक्त्याविरुद्ध
गुन्हा दाखल
मुजफ्फरनगर : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजकुमार भाटी यांच्याविरोधात ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. जसवीर सिंह यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या मानहानी आणि समाजात वैमनस्य पसरविण्याशी संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदविण्यात आला. जाट महासभेसह काही संघटनांनी भाटी यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करून कारवाईची मागणी केली होती.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Latest Marathi News Live Update : केदारनाथ मंदिरासाठी चालवल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवा खराब हवामानामुळे स्थगित

SCROLL FOR NEXT