malegaon
malegaon sakal
पुणे

माळेगावच्या गोळीबार प्रकरणात माजी सरपंचांना जामीन मंजूर

कल्याण पाचांगणे, माळेगाव

माळेगाव :  माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथील राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक झालेले माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना पुणे (Pune) येथील मोक्का न्यायालयाने (Mcoca Court) आज जामीन मंजूर केला. जखमी रविराज यांनी गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांच्या कटकारस्थानात जयदीप यांचा सहभाग आहे, असा जबाब पोलिसांना दिला होता. त्यानुसार तपास अधिकारी तथा उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी एक महिन्यापुर्वी जयदीप यांच्याविरुद्ध मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली होती. (Former sarpanch granted bail in Malegaon shooting case)

परंतु, दरम्यानच्या कालावधीत पोलिस तपासामध्ये जयदीप यांचा वरील गोळीबार प्रकरणात कसलाच सहभाग अढळून आला नाही, अर्थात तसा अहवाल संबंधित तपास अधिकारी शिरगावकर यांनी मोक्का न्यायाधीश जेपी अगरवाल यांच्यासमोर आज सुपुर्द केला. त्याच वेळी अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. र्धेयशिल जगताप, अॅड. सचिन वाघ यांनी जयदीप यांच्या बाजूने केलेला युक्तवाद संबंधित न्यायालयाने ग्राह्य धरला आणि जमीनाचा मार्ग मोकळा झाला. ही बातमी माळेगाव परिसरात कळताच जयदीप यांच्या समर्थकांनी गावात फटाक्यांची अतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. 

"माळेगावमध्ये रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाला, ही गोष्ट निंदनिय आहे. या गोळीबार प्रकरणातील सुरवातीला पकडलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कडक कारवाई केली, त्याबाबत कोणाचेच दुमत नव्हते. परंतु राजकीय आकसापोटी जयदीप तावरे यांना अटक झाल्याने गावात विनाकारण तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी निपक्षपाती गोळीबार प्रकरणाचा तपास केल्यामुळेच जयदीपला जामीन मंजूर होण्यास मदत झाली, याचे समधान  वाटते," अशी भूमिका माळेगावचे माजी संचालक दिपक तावरे यांनी स्पष्ट केली.

दरम्यान, रविराज तावरे यांच्यावर ३१ मार्च रोजी गोळीबार झाला होता. त्यावेळी पोलिसांनी प्रथमदर्शनी उपलब्ध झालेल्या फिर्य़ादिच्या आधारे चार आरोपींवर संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली होती. अद्याप अटक असलेल्यांमध्ये प्रशांत पोपटराव मोरे, टाॅम उर्फ विनोद पोपटराव मोरे,  राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव ( सर्व रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती ) समावेश आहे, तर एका अल्पवयीन मुलाला जामिनावर सोडण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT