Former students build modern laboratory for shri Shivaji school pune sakal
पुणे

Pune News : माजी विद्यार्थी तब्बल पन्नास वर्षांनी एकत्र येऊन विद्यालयासाठी उभारणार आधुनिक प्रयोगशाळा

आधुनिक प्रयोगशाळा उभारणीसाठी तीन लाख रुपये निधी संकलित करण्याचा निश्चय ...

सकाळ वृत्तसेवा

पारगाव : धामणी ता. आंबेगाव येथील श्री.शिवाजी विद्यालयातील सन १९७२-७३ व १९७३-७४ च्या इयत्ता दहावीच्या बॅच चे माजी विद्यार्थी तब्बल ५० वर्षांनी एकत्र येत विद्यालयाच्या आधुनिक प्रयोगशाळा उभारणीसाठी तीन लाख रुपये निधी संकलित करण्याचा निश्चय केला.

विद्यालयातील सन १९७२-७३ व १९७३-७४ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी दोन्ही बॅच चे मिळून एकूण ६० माजी विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमा पूजन तसेच दीप प्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात झाली

मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन उद्योजक डॉ. अशोक पगारिया, उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे, विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. गायकवाड ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.जी.जाधव, सेवानिवृत्त प्राचार्य लक्ष्मण वाळुंज, प्रा.रावसाहेब जाधव उपस्थित होते.

मेळाव्याचे नियोजन खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, अशोक जाधव, डॉ. वसंत खांडगे, वामन वळसे पाटील, ज्ञानेश्वर ढगे, बाबुराव ढोबळे, रामदास रोडे, गोविंद देशमुख, जयवंत तिखे यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी केले होते.

विद्यालयाच्या आधुनिक प्रयोगशाळा उभारणीसाठी तीन लाख रुपये निधी संकलित करण्याचा निश्चय माजी विद्यार्थ्यांनी यावेळी केला. मेळाव्यातच रोख ४० हजार रुपये जमा झाले.

यावेळी बोलताना उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे म्हणाले आम्ही धामणीकर सर्व उद्योजक व काही माजी विद्यार्थी विद्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे रंगकाम करून देणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन भगवान वाघ यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT