Former Zilla Parishad member Navnath Parge's cousin Shekhar Parge has been attacked in Kirkatwadi 
पुणे

माजी जिल्हा परिषद सदस्याच्या भावावर कोयत्याने वार ; सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील घटना

निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे) : माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांचा चुलत भाऊ शेखर पारगे यांच्यावर डोणजे (ता.हवेली) येथील जिव्हाळा फार्महाऊसवर पहाटे दोन वाजेच्या सुमारास कोयत्याने वार करण्यात आला आहे. शाब्दिक वादाचे रूपांतर भांडणात होऊन हा जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचे हवेली पोलिसांकडून सांगण्यात आले.

या प्रकरणी हवेली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीमधील जिव्हाळा फार्महाऊसवर शेखर पारगे आपल्या मित्रांसह मद्यपान करत बसले होते. त्याच हॉटेलमध्ये डोणजे येथील काही तरुण मद्यपान व जेवणासाठी बसले होते. मध्यरात्रीनंतर शेखर पारगे आणि इतर तरुणांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. राग अनावर झाल्यावर शाकीर शेख, सज्जद शेख व इतर दोघांनी डोणजे येथे जाऊन कोयते व सत्तुर घेऊन येत शेखर पारगे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये शेखर पारगे याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. शेखर पारगे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्ला झाल्यापासून चारही हल्लेखोर फरार झाले आहेत. हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

ग्रामपंचायत सदस्य पदी झाली होती बिनविरोध निवड

सध्या डोणजे ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून यामध्ये शेखर पारगे याची डोणजे ग्रामपंचायत सदस्य पदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र या हल्ल्यामागे ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे.

विनापरवाना मद्यपान सुरू कसे?

जिव्हाळा फार्महाउसला कुठल्याही प्रकारचा मद्यविक्री किंवा बारचा परवाना नाही. तरीही याठिकाणी पहाटेपर्यंत मद्यपान कसे सुरु होते? हॉटेल रस्त्याला लागून असताना रात्रगस्ती दरम्यान पोलिसांच्या हा प्रकार कसा लक्षात आला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT