Founder of ICT Mumbai prof sunil bhagwat appointed as the next director of iiser pune sakal
पुणे

Sunil Bhagwat : आयसरच्या संचालकपदी प्रा. सुनील भागवत

स्थापनेनंतरचे तिसरे संचालक; आयसीटी मुंबईचे अधिष्ठाता

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ प्रा. सुनील भागवत यांची पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या (आयसर पुणे) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपंतींद्वारे ही निवड जाहीर करण्यात आली असून, मावळते संचालक प्रा. जयंत उदगावकर यांच्याकडून ते पदभार स्विकारतील.

प्रा. भागवत सध्या मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेत शैक्षणिक कार्यक्रमांचे प्राध्यापक आणि अधिष्ठाता आहेत. त्यांच्या नावावर अनेक उल्लेखनीय संशोधने आणि पेटंट आहेत. रसायन अभियंता म्हणून ओळखले जाणारे प्रा. भागवत यांचे संशोधन इंटरफेसियल विज्ञान आणि अभियांत्रिकी, उर्जा आणि ऊर्जा अभियांत्रिकी, संगणक प्रक्रिया सिम्युलेशन आणि कृत्रिम न्यूरल नेटवर्क या क्षेत्रांमध्ये आहे. ते एक लोकप्रिय शिक्षक आणि संशोधक आहे.

म्हणूनच त्यांना २०१६ मध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (आयएनएसए) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००६ मध्ये आयसर पुणे सुरू झाल्यापासून प्रा. भागवत हे तिसरे संचालक असतील. २०१७ पासून प्रा. जयंत उदगावकर संचालक पदाचा कार्यभार होता.

ऊर्जा अभियांत्रिकीत मोठे योगदान

प्रा. भागवत यांच्याकडे १२ पेक्षा जास्त पेटंट आहे. विशेष म्हणजे उर्जेचे थर्मोडायनामिक्स आणि ऊर्जा अभियांत्रिकीवर त्यांचा विशेष भर आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत १०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT