अटक google
पुणे

चितळे बंधूंना २० लाखांच्या खंडणीसाठी धमकी; चौघांना अटक

नामदेव कुंभार

पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध चितळे उद्योग समूहाकडून पुरवल्या जाणाऱ्या दुधात काळा पदार्थ आढळल्याचं सांगून व बदनामीची धमकी देऊन 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चितळे बंधूंना धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका तरुणीचाही समावेश आहे. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने याप्रकरणी आतापर्यंत एका शिक्षिकेसह चौघांना अटक केली आहे.

पुनम सुनील परदेशी (वय 27), सुनील बेनी परदेशी (वय 49), करण सुनील परदेशी (वय 22), अक्षय मनोज कार्तिक (वय 30) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दुग्ध विक्री कंपनीचे सहाय्यक विपणन प्रतिनिधी नामदेव बाबुराव पवार (वय 62) यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनम परदेशी या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या दुधामध्ये काळ्या रंगाचा पदार्थ आढळून आला. त्यामुळे तिने दुधात भेसळ करण्यात आली असल्याचा तसेच दूध खराब असल्याचा ईमेल दोन जून रोजी दुग्ध व्यावसायिकाच्या ग्राहकाच्या तक्रार निवारण केंद्राकडे पाठवला होता.

चितळे यांच्या प्रतिनिधीनी ही तक्रार नोंदवून घेतली. मात्र, त्यानंतर या तक्रारीच्या आधारे आरोपींनी संबंधितांना त्रास देण्यास सुरुवात केली. कधी फोन करून किंवा कधी प्रत्यक्ष भेटून आरोपी कंपनीच्या प्रतिनिधींना धमकावत होते."तुमच्याविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) आणि पोलिसांकडे तक्रार करते, तुमची शहरातील दुकाने बंद करून, तुमची बदनामी करू,'' अशी धमकी मेलच्या माध्यमातून दिली होती.

या घटनेनंतर त्या महिलेनं दूग्ध विक्री व्यावसायिकाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी नामदेव पवार यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी या प्रकरणाचा तत्काळ तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस निरीक्षक भरत जाधव, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय थोरात, अमोल पवार यांच्या पथकाने सापळा रचून पुनम, तिचे वडील, भाऊ करण व बहीणीचा पती कार्तिक यांना पकडले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कार्तिक विरुद्ध यापूर्वी वानवडी, मुंढवा पोलिस ठाण्यात मारामारी, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सुनील आणि करण यांच्याविरुद्धही याआधीह गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT