पुणे

चार म्हशींना धडक देऊन उलटला कंटेनर; कुठे घडली ही घटना

विठ्ठल तांबे

धायरी : जांभूळवाडी दरी पुलावर नवीन कात्रज बोगद्याकडून येणाऱ्या भरधाव कंटेनरने चार म्हशींना ठोकरले त्यानंतर कंटेनर उलटला. या अपघातात चारही म्हशींचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवार (ता. 17) सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान, या अपघातात क्रमांक-MH४६AF८९५१ हा कंटेनर उलटला आहे. कंटेनर नवीन कात्रज बोगद्यकडून पुण्याकडे येत होता. या हा अपघात झाला.

तसेच हा अपघातात इतका भयानक होता की, एक किलोमीटर अगोदरच तीन म्हशींना धडक देत कंटेनर पुढे आला. अपघातानंतर अडकलेल्या एका म्हशीस कंटेनरने जवळपास एक किलोमीटरपर्यंत ओढत आणले.  त्यानंतर कंटेनर उलटला. या अपघातात ठार झालेल्या चारही म्हशी या ज्ञानोबा पंढरीनाथ जांभळे (रा. जांभुळवाडी) यांच्या मालकीच्या होत्या.

दरम्यान, जांभळे हे म्हशींना चारून घरी जात असताना हा अपघात घडला. यावेळी भरती विद्यपीठ पोलिस ठाण्या अंकित दत्तनगर चौकीमध्ये कंटेनरच्या चालकास नेण्यात आले आहे. व पुढील कारवाई सुरु आहे. सिंहगड रस्ता वाहतूक विभाग पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, ते क्रेनच्या साहय्याने कंटेनर रस्त्यावरून हटविण्याचे काम करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT