juvenile correctional home in Yerawada sakal
पुणे

Yerawada : येरवड्यातील बालसुधारगृहातून चार मुले फरार

येरवडा येथील बालसुधारगृहात गोंधळाचा फायदा घेत भिंतीला शिडी लावून चार मुलांनी धूम ठोकली.

सकाळ वृत्तसेवा

येरवडा येथील बालसुधारगृहात गोंधळाचा फायदा घेत भिंतीला शिडी लावून चार मुलांनी धूम ठोकली.

पुणे - येरवडा येथील बालसुधारगृहात गोंधळाचा फायदा घेत भिंतीला शिडी लावून चार मुलांनी धूम ठोकली. ही घटना १८ एप्रिल रोजी दुपारी घडली. याच बालसुधारगृहातून तीन महिन्यांपूर्वी चार अल्पवयीन मुले पसार झाल्याची घटना घडली होती.

या संदर्भात पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील कर्मचारी सुमंत अशोक जाधव (रा. अप्पर इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथे पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्राचे बालनिरीक्षणगृह आहे. गंभीर गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांना बालन्याय मंडळाच्या आदेशानुसार या बालसुधारगृहात ठेवण्यात येते. बालसुधारगृहात अल्पवयीन मुलांच्या दोन गटांत किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. नऊ अल्पवयीन मुलांनी दोन मुलांना मारहाण केली. त्यामुळे बालसुधारगृहाच्या आवारात गोंधळ उडाला. त्याचा फायदा घेत चार अल्पवयीन मुलांनी भिंतीला शिडी लावून धूम ठोकली. या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच अन् राष्ट्रवादी अजितदादांची! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर CM फडणवीसांचे भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चा

IND vs SL 1st Test : बुमराहची अनुपस्थितीत, दोन गोलंदाजांपैकी निवडू कोणाला? शुभमन गिल पहिल्या सामन्यापूर्वी पेचात अडकला, म्हणाला...

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

अमिताभ बच्चन यांच्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाण्याने रातोरात स्टार झाली, कुटुंबासाठी सोडली इंडस्ट्री; आता कुठे आहे अभिनेत्री?

Marathi News Live Updates : शिवसेना अन् राष्ट्रवादी कुणाची? २०२४ च्या 'लोकन्यायालया'चा दाखला देत फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला

SCROLL FOR NEXT