Corona Patient Sakal
पुणे

Corona Patient : आंबेगाव तालुक्यात चार कोरोनाचे रुग्ण; प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

मंचर उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या आरोग्य तपासणी चाचणीमध्ये तीन महिला व एक पुरुष असे एकूण चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

डी. के. वळसे पाटील

मंचर - मंचर उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या आरोग्य तपासणी चाचणीमध्ये तीन महिला व एक पुरुष असे एकूण चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सर्व रुग्ण आंबेगाव तालुक्यातील असून दोन रुग्ण मंचर, एक रुग्ण श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग व एक रुग्ण खडकी पिंपळगाव येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सर्व जेष्ठ नागरिक आहेत.

आंबेगाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. तुषार पवार म्हणाले, 'खबरदारीचा उपाय म्हणून चारही रुग्णांना होम कोरोटाईन केले आहे. त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत होता. संशय आल्यामुळे त्यांची चाचणी केली होती. त्यांच्यावर घरी जाऊन उपचार सुरु केले आहेत.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आपल्या कार्यक्षेत्रात खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे जाणवणाऱ्या ची वैद्यकीय चाचणी करणे विषयी सूचना दिले नागरिकांनी घाबरून जाऊ नये पण काळजी मात्र घ्यावी'.

'मंचर उपजिल्हा रुग्णालयात दखल होणाऱ्या व लक्षणे असलेल्या रुग्णांचीही तपासणी केली जात आहे. सर्दी, खोकला ताप, अशक्तपणा जाणवणाऱ्या रुग्णांनी तसेच संबंधित कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी त्वरित मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.' असे आवाहन वैद्यकीय अधिकारी श्वेता गोऱ्हाणे यांनी केले आहे.

'मंचर शहरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती समजली. त्यानुसार मंचर नगरपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाय ताबडतोब हाती घेतले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी म्हणून जनजागृती सुरु केली आहे. दररोज मास्क वापरावेत. कुटुंबातील सदस्यांनी जेष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी. शक्यतो गर्दीत जाणे टाळावे.'

- गोविंद जाधव, मुख्याधिकारी मंचर नगरपंचायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT