police custody Sakal
पुणे

संतोष जाधवच्या टोळीतील चौघांना पोलिस कोठडी

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधव याच्या टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधव याच्या टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे - व्यावसायिकाकडे पन्नास हजार रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधव याच्या टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

जिशान इलाहीबक्ष मुंढे (वय २०), वैभव ऊर्फ भोला शांताराम तिटकारे (वय १९, दोघे रा. आंबेगाव), सचिन बबन तिटकारे (वय २२) आणि रोहित विठ्ठल तिटकारे (वय २४, दोघे रा. नायफड, खेड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी आरोपींना २९ ऑगस्टपर्यंत मोक्का कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी संतोष जाधवसह एकूण बारा जणांविरोधात नारायणगाव पोलिस ठाण्यात मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायणगावातील इंदिरानगर येथील व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. जाधव याने या व्यावसायिकाकडे ‘व्हॉट्सअप कॉल’वर पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती; तसेच एका साथीदाराला व्यावसायिकाच्या ‘वॉटर प्लांट’वर पाठवून, खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती, असे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणात पोलिसांनी जिशान, वैभव, सचिन आणि रोहितला अटक करत विशेष न्यायालयात हजर केले. पोलिसांनी आरोपींकडून पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. आरोपींनी पिस्तुले कशासाठी आणली होती, याचा तपास करायचा आहे. आरोपींची संघटित टोळी तयार झाली असून, त्यांनी गुन्हेगारीतून बेकायदा कमविलेल्या मालमत्तेचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT