Accident Sakal
पुणे

इंदापूरजवळ अपघातात चार जण जागीच ठार

इंदापूरजवळील ईरटिगा गाडीचा टायर फुटल्याने गाडी दुभाजक तोडून बोलेरो गाडीला जाऊन जोरात धडकली.

प्रशांत पाटील

इंदापूर - पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Solapur National Highway) इंदापूरपासून (Indapur) दोन किलोमीटर अंतरावर सरडेवाडी (ता. इंदापूर) येथे व्यवहारे पेट्रोलपंपाजवळ सोमवारी (ता. ७) दुपारी तीन वाजता ईरटिगा मोटार टायर फुटून विरुद्ध दिशेच्या बोलेरो गाडीस जाऊन धडकल्याने (Accidnet) झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार (Death) झाले. (Four Death in Accident near Indapur)

या अपघातात बोलेरो गाडीतील अविनाश कुंडलिक पवार (वय ३२), गणेश पोपट गोडसे (वय ३४), बाळासाहेब चांगदेव साळुंखे (सर्व रा. गुरसाळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) व ईरटिगा गाडीचा चालक ज्योतिराम सूर्यभान पवार (वय ३०, रा. उलवे जि. रायगड) हे जागीच ठार झाले.

सोलापूर महामार्गावरून सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बोलेरो गाडी (क्र. एमएच १३ एझेड ३९०१) पुण्याकडून सोलापूरकडे निघाली होते. यामध्ये तीन प्रवासी होते; तर ईरटीगा मोटार (क्र. एमएच ४६ बीई ४५१५) सोलापूरकडून पुण्याकडे भरधाव निघाली होती. इंदापूरजवळील व्यवहारे पेट्रोल पंपाजवळ ईरटिगाचा टायर फुटल्याने ही गाडी दुभाजक तोडून बोलेरो गाडीला जाऊन जोरात धडकली. या अपघातात बोलेरोमधील तिघेही आणि ईरटिगा चालक जागीच ठार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT