पुणे

पुणे : चारशे टन चिकन आणि 18 टन मासळी फस्त

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी मासळी, चिकन आणि मटण बाजारात मोठी उलाढाल झाली. शहर आणि जिल्ह्यातील खवय्यांनी सुमारे 400 टन चिकन, चार टन मटण आणि सुमारे 18 टन मासळी फस्त केली. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने गेल्या दोन दिवसांत मटणाच्या भावात 20 रुपयांनी वाढ झाली, तर चिकन व मटणाचे भाव स्थिर राहिले, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गणेश पेठेतील मासळी बाजार, कसबा पेठेतील मटण मार्केट, पौड फाटा येथील मासळी बाजार, लष्कर परिसरातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट येथील बाजारात आज सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. सर्वसामान्य व्यक्तींबरोबरच हॉटेल व्यावसायिकांनी येथूनच खरेदी केली. मटण खरेदीसाठी काही ठिकाणी रांगाही लागल्या होत्या.

पुणे जिल्ह्यातील कुक्कटपालन करणाऱ्या खासगी कंपन्यांकडून जिवंत कोंबड्यांची मोठी आवक झाली. साधारणपणे शहर आणि जिल्ह्यात चारशे टन चिकनची विक्री झाल्याची माहिती शीतल ऍग्रोचे रूपेश परदेशी यांनी दिली.

गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी म्हणाले, ""पावसाळ्यामुळे पश्‍चिम किनारपट्टीवर मासेमारी बंद आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून पूर्व किनारपट्टीवरून आवक सुरू आहे. घरगुती ग्राहक तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून मासळीला मोठी मागणी राहिली.''

आषाढातील शेवटच्या दिवशी मटणाला मोठी मागणी होती. दिवसभरात शहर आणि जिल्ह्यात चार टन मटणाची विक्री झाली. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मागणी कमी होती.

- प्रभाकर कांबळे, अध्यक्ष, मटण विक्रेता दुकानदार संघटना

आखाड पार्टी जोरात

गेल्या काही वर्षांपासून आखाड पार्टी हा इव्हेंट झाला आहे. कुटुंबीय, मित्र-मंडळी, कार्यालयातील सहकारी यांच्यासोबत एकत्र येऊन ही पार्टी साजरी केली जाते. यंदाही अनेक ठिकाणी आज ही आखाड पार्टी जोरात झाली. त्यात "चुलीवरील मटणा'ला अनेकांनी पसंती दिली. काहींनी विविध मांसाहारी हॉटेलना पसंती दिली. तुपातलं मटण, गावरान कोंबडा, काळ्या रस्स्यातील मटण, मटण-चिकन दम बिर्याणी, मच्छी फ्राय या पदार्थांना हॉटेलमधून आज मोठ्या प्रमाणावर मागणी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT