Truck Car Accident Pune-Solapur National Highway esakal
पुणे

Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात; दुर्घटनेत 4 जण जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात झाला आहे.

Accident News : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur National Highway) ट्रक आणि कारचा भीषण अपघात (Truck -Car Accident) झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर भागात असणाऱ्या कदमवाकवस्ती इथं ट्रक आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला.

आज सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत जवळील रस्त्यावरून कार गाडीतून चौघे सोलापूरच्या दिशेनं निघाले होते. यावेळी कारच्या पुढं असलेल्या मालवाहू ट्रकनं अचानक ब्रेक दाबल्यानं पाठीमागं असलेल्या चारचाकी चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटून चारचाकी गाडी थेट ट्रकच्या खाली आली.

दरम्यान, स्थानिक नागरिक आणि लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) चारचाकी गाडीत अडकलेल्या चौघांना काढण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. या अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातातील चौघे कोण आहेत, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने ७५ वर्षीय महिलेला उडवलं, चालक अपघातानंतर फरार

Konkan Railway: ब्रिटिशांनाही अशक्य वाटलेली कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणणारे मधु दंडवते, सावंतवाडी स्थानकाला नावासाठी अनेक वर्षे संघर्ष

SCROLL FOR NEXT