PNE18O35498.jpg
PNE18O35498.jpg 
पुणे

भीक मागण्यासाठी चार महिन्यांचे बाळ पळविले

पांडुरंग सरोदे

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर रात्रीच्यावेळी झोपलेल्या एका महिला प्रवाशांच्या चार महिन्यांच्या बाळाला पळवून नेणाऱ्या महिलेस लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. संबंधित महिला मुंबईतील जोगेश्‍वरी येथील पुलाखाली बाळाला घेऊन भीक मागत असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला सापळा रचून पकडले. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी बाळाला त्याच्या आईकडे सोपविले. 

याप्रकरणी संगीता आनंद कंग (वय 25, रा. कोपार्डे, करवीर, कोल्हापूर) यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी मनीषा महेश काळे (वय 25, रा हडपसर रेल्वे स्थानक झोपडपट्टी, मुळ भूतकरवाडी, भिंगार, अहमदनगर) हिला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 

संगीता या पंधरा दिवसांपुर्वी त्यांचा चार महिन्यांचा मुलगा प्रमोद याला घेऊन पुण्यात आल्या होत्या. 17 ऑगस्टला त्या पुणे रेल्वे स्थानकावरील दोन क्रमांकाच्या फलाटाजवळील पुस्तकांच्या दुकानाजवळ झोपल्या. मध्यरात्री त्यांच्याजवळ असलेल्या बाळाला अनोळखी व्यक्तीने पळवून नेल्याचे सकाळी त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली. 

पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणातुन महिलेचे छायाचित्र मिळवून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी रेल्वे स्थानक परिसरातील सर्व भिक्षेकऱ्यांकडे चौकशी केली. त्यानंतर दत्त मंदिर, मंडई व अन्य गर्दीच्या ठिकाणी असलेल्या भिक्षेकऱ्यांकडेही शोध घेतला. दरम्यान एक महिला छोट्या बाळासह बकरी जोगेश्‍वरी येथील पुलाखाली भिक मागत असल्याची माहिती पोलिसांना एका महिलेकडून मिळाली. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने महिलेस ताब्यात घेतले. लहान बाळामुळे जास्त भिक मिळत असल्याचे कारण सांगत बाळ पळवून नेल्याचे तिने कबूल केले. 

संगीता कंग स्वतः निराधार आहेत. त्यांना तिने मुले आहेत. त्यापैकी दोन मोठी मुले त्यांनी गावाकडील बहिणीकडे ठेवली आहेत. तर पोट भरण्यासाठी बाळाला घेऊन त्या पुण्यात आल्या होत्या. पुण्यात आल्यानंतर त्या भीक मागून उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी संगीता यांचे पुनर्वसन करणार असल्याचे स्पष्ट केले. 
 
बाळ चोरुन नेत असतानाचा प्रकार एका महिलेने पाहिला होता, तिनेच पुढे पोलिसांना मदत केली. संबंधीत महिला मुंबईत फिरत असतानाच तिला मनीषा काळे दिलसी. त्यानंतर तिने ही बाब पुणे लोहमार्ग पोलिसांना कळविली. पोलिसांना मदत करणाऱ्या महिलेलाही बक्षिस देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

""मला तीन मुले आहेत. गावगाकडे उदरनिर्वाहाचे साधन नाही. त्यामुळे मोठी दोन मुले गावाला बहिणीकडे ठेवून पोट चार महिन्यांच्या बाळाला घेऊन मी पंधरा दिवसापुर्वी पुण्याला आले. रेल्वे स्थानक परिसरातच भीक मागून उदरनिर्वाह भागविते. 17 तारखेला रात्री झोपल्यानंतर माझ्या बाळाला पळवून नेले होते.''
- संगीता कंग, बाळाची आई. 
------------------- 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT