crime1.jpg 
पुणे

चार मोस्ट वॅान्टेड आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

सकाळवृत्तसेवा

हडपसर (पुणे) : विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी व चोरीच्या गंभीर गुन्ह्यात मोस्ट वॅान्टेड असलेल्या ४ आरोपींना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यापैकी एक आरोपी विधीसंघर्षीत आहे. आरोपींकडून ६ लाख १० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येतील असा विश्वास हडपसर पोलिसांना आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सन्नीसिंग पापासिंग दुधाणी (वय १९ बिराजदारनगर, हडपसर), अक्षय संतोष सोनी ( वय २८, सुरक्षानगर, हडपसर), बिरजुसिंग रजपुतसिंग दुधानी ( वय ३५ रा. रामटेकडी, हडपसर) या तिघांचा समावेश आहे. तर विधीसंघर्षित बालकाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

सन्नीसिंग दुधाणी हा पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व धुळे जिल्हा असे एकूण २० गुन्ह्यातील मोस्ट वॅान्टेड आरोपी आहे. तर बिरजुसिंग दुधानी हा पुणे शहर व धुळे जिल्हा असे एकूण २५ गुन्ह्यातील मोस्ट वॅान्टेड आरोपी आहे. पोलिस कर्मचारी नितीन मुंढे, अकबर शेख, प्रताप गायकवाड, शाहिद शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भेकराईनगर येथे सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी चौकशीमध्ये हडपसर, मांजरी, गोंधळेनगर, सातववाडी, ससाणेनगर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव या परिसरामध्ये घरफोडी, चोरी व वाहन चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ गुन्हे व मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १ गुन्हा तसेच मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २ वाहन चोरीचा व चिंचवड पोलिस ठाण्याकडील १ गुन्हा उघडकीस आणून आरोपींकडून ६ लाख १० हजार रूपये किंमतीचे ११० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व यामाहा कंपनीची दुचाकी गाडी जप्त केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सदरची कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, पोलीस उपआयुक्त सुहास बावचे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलिस निरिक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक हिमालय जोशी, युसुफ पठाण, रमेश साबळे, प्रशांत टोणपे, राजेश नवले, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, गोविंद चिवळे, शशिकांत नाळे, प्रविण उत्तेकर यांच्या पथकाने केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना; प्रभादेवीत भरधाव कार थेट गर्दीत घुसली, चार जणांना दुखापत

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT