Liqour 
पुणे

लॉकडाऊनमध्येही 'ते' करत होते दारुची विक्री; तब्बल 'एवढा' मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये दारू विक्री करण्यासाठी बंदी असतानाही चोरून दारू विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दारु आणि रोख रक्कम असा ८३ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला.

विठ्ठल दावलचा सावजी (रा.पोकळे वस्ती बिबवेवाडी), बबलू बन्सीलाल श्रीवास्तव,  कालिदास किसन मिसळे (दोघेही रा. सिद्धार्थ नगर, सहकारनगर) आणि धीरज रामलाल परदेशी (रा. बंडगार्डन) असे अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक रविवारी सकाळी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी  पुष्प मंगल चौकातीक सुप्रीम औद्योगिक परीसराच्या मागील बाजूस काही व्यक्ती चोरून दारू विक्री करीत असल्याची खबर पथकास मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्या पथकाने घटनास्थळी छापा घातला. त्यावेळी त्यांना चौघेजण दारू विक्री करताना निदर्शनास आले.

त्यानुसार त्यांनी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ८० हजार आठशे रुपये किंमतीची देशी दारू आणि बियरच्या बाटल्या, दारू विक्रीची २ हजार ६३० रूपयांची रोख रक्कम असा एकूण ८३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध पोलिस महाराष्ट्र दारूबंदी कायदा व राष्ट्रीय साथरोग आपत्ती कायद्यान्वये सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT