Nirgudsar in Ambegaon esakal
पुणे

Ambegaon News : शाळेला सुट्टी असल्यामुळे गावी आलेल्या विद्यार्थ्यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी अंत; शेतमजूर कुटुंबात शोककळा

निरगुडसर येथे आज (शुक्रवार) दुपारी साडेतीन वाजता शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

डी.के वळसे पाटील

शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुले शेततळ्यामध्ये उतरली होती. त्यांना पोहता येत नव्हते.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील (Nirgudsar Ambegaon) निरगुडसर येथे आज (शुक्रवार) दुपारी साडेतीन वाजता शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही मुले शेतमजूर (Farm laborer) कुटुंबातील आहेत. श्रद्धा काळू नवले (वय १३ इयत्ता सातवी)सायली काळू नवले (वय ११ इयत्ता पाचवी) दीपक दत्ता मध्ये (रा. कानेवाडी राजगुरुनगर) राधिका नितीन केदारी (वय 14 रा. कानेवाडी राजगुरुनगर) अशी बुडालेल्यांची नावे आहेत.

श्रद्धा व सायली ही दोन्ही मुले गोरक्षनाथ बबन कवठे (रा. जवळे बाळेश्वर संगमनेर जिल्हा नगर) यांनी दत्तक घेतली आहेत. कवठे हे शेतमजुरीचे काम करतात. ही दोन्ही भावंडे निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय शिक्षण घेत होते.

शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुले शेततळ्यामध्ये उतरली होती. त्यांना पोहता येत नव्हते. ही मुले बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कवठे त्यांची पत्नी ज्योती तातडीने शेततळ्याजवळ गेले. पण, तोपर्यंत मुलांची प्राणज्योत मालवली होती. देवेंद्र शेठ शहा फाउंडेशन रुग्णवाहिका चालक स्वप्निल मोरे यांनी चारही मुलांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शेतमजूर कुटुंबांवर शोक काळा पसरली आहे. पारगाव पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT