पुणे

पुण्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाच्या आढाव्यासाठी चार पथके

सकाळवृत्तसेवा

पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चार पथकांची स्थापना केली आहे. या पथकांवर विविध तालुक्‍यांची पाहणी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी
सोपविण्यात आली आहे. यानुसार उद्या (बुधवारी) ही पथके पाहणी करणार आहेत.

या पथकांमध्ये जिल्हाधिकारी देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, संदीप कोहीनकर, दत्तात्रेय मुंडे, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके आदींचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथक दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदर या तालुक्‍याची पाहणी करणार आहे. दुसरे पथक अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील आहे. हे पथक भोर, वेल्हे, मुळशी व मावळ, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी
अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथक तिसरे पथक खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक हवेली तालुक्‍याची पाहणी करणार आहे.

या पाहणीत "माझे कुटुंब, माझी जबाबदारी, कोविड व्यवस्थापन, डाटा रिकन्सिलेशन, डाटा अपडेशन, गंभीर रुग्णांबाबतची व्यवस्था आदींची पाहणी करणार आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिन्ही राजेंची माघार; ९ जागा बिनविरोध, १२ जागांसाठी २८ उमेदवार, नेमकं काय घडलं?

विमा नसलेल्या गाडीच्या अपघातानंतर नुकसानभरपाई का देत नाही? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला योजनेवरून सवाल

CJP Leaders Notice : सौरव दास,आशुतोष रांका यांच्या अडचणी वाढल्या ! तिहारमधून सुटताच क्राईम ब्रँचची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर; अवघ्या आठवडाभरात घसरली हवेची गुणवत्ता

IND vs NZ 1st T20I : भारत-न्यूझीलंड पहिला सामना Live कुठे पाहता येणार? किती वाजता मॅच सुरू होणार अन् Playing XI मध्ये कोण दिसणार?

SCROLL FOR NEXT