Pune  sakal
पुणे

Pune : चार चाकी गाडीच्या काचा फोडून 6 लाख 82 हजार 500 रुपयांचे सोने लंपास

सोन्याचांदीचे दागिने दोन अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना

सावता नवले

सोन्याचांदीचे दागिने दोन अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील खडकी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या हाॅटेल शौर्यवाडा पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार चाकी गाडीच्या काचा भरदुपारी फोडून सिटावरील 6 लाख 82 हजार 500 रूपयाचे सोन्याचांदीचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना घडली. यासंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे येथून सुशिल शरणाअप्पा होसमणी हे कुटुंबियासह चारचाकी ( एमएच. 43, बीवाय. 3920 ) गाडीने रविवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरून सोलापूरकडे जात होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास होसमणी कुटुंब दौंड तालुक्यातील खडकी येथील महामार्गालगतच्या शौर्यवाडा या हाॅटेल येथे जेवण करण्यासाठी थांबले. चालकाने गाडी हाॅटेलच्या पार्किंगमध्ये लावून जेवण करण्यासाठी हाॅटेलमध्ये आला.

सव्वा चारच्या सुमारास जेवण झाल्यानंतर गाडीकडे गेले असता चालकाच्या मागील दरवाजाची काच फोडून सिटावरील पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. या पर्समध्ये मंगळसूत्र, अंगठ्या, इत्यादी सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा 6 लाख 82 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला. हाॅटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये दुचाकीवरील आलेल्या दोन अज्ञात चोरटयापैकी एकाने गाडीची काच फोडून दागिन्यांची चोरी केल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले आहे.

या संदर्भात सुशिल शरणाअप्पा होसमणी ( रा. 1106 आदित्य मल्हार सोसायटी, शिंदेवस्ती रावेत पुणे ) यांनी पोलिसात फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दोन अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हा

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT