पुणे

पेठला जळत्या गाडीचा थरार पाहून अंगावर शहारे!

जयदीप हिरवे

सातगाव पठार : पेठ (ता. आंबेगाव) येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास पेठ बायपास वरील पुलानजीक एक टाटा जेस्ट गाडी क्रमांक (MH14EY8450) ही फोरव्हीलर पेट्रोल गाडीने अचानक पेट घेतला. गाडी मालक प्रदीप सोमवंशी राहणार भोसरी आदित्य नगर यांना गाडीचा डॅश बोर्डवर सूचना आल्यानंतर गाडी पटकन बाजूला घेतली असता थोडा धुर दिसला. बोनेट उघडल्यावर जाळ बाहेर आला. जाळ आटोक्यात न आल्यामुळे गाडीने प्रचंड पेट घेतला. आणि पाहता-पाहता गाडी जळून खाक झाली. हायवेवर गाडी पेटल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच महामार्गावर बघ्यांची गर्दी झाली होती. पेठ येथील मृत्यूंजय दूत दिलीप धुमाळ यानी महामार्ग पोलिस आणि मंचर पोलिसांना फोन करून घटनेची कल्पना दिली. याकामी मृत्युंजय दूत अशोक राक्षे, माजी उपसरपंच अनिल सनस, संजय वाव्हळ यांनी घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

घटनास्थळी आळेफाटा महामार्ग वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांच्या सुचनेनुसार लगेचच त्यांचे सहकारी पोलिस फौजदार दादासाहेब मोशे, प्रकाश मडके तसेच मंचर पोलिस स्टेशनचे राजेंद्र हिले, संजय नाडेकर तसेच उबाळे हे पोलिस कर्मचारी हजर होऊन वाहतूक सुरळीतपणे केली.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT