gift sakal
पुणे

शिष्यवृत्तीतील यशामुळे शिक्षकांना चारचाकी भेट!

शिरूरमधील बुरुंजवाडी ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर : बुरुंजवाडी (ता.शिरूर) येथील ग्रामस्थांनी इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम निकाल लागल्याने खूष होऊन सोमनाथ सातव गुरुजींना चारचाकी भेट दिली. सरपंच कावेरी नळकांडे व उपसरपंच नानासाहेब रुके यांच्या हस्ते गाडीची चावी नुकतीच सातव गुरुजींकडे सुर्पूत केली.

बुरुंजवाडीची इयत्ता सातवी व चौथी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत जिल्हा-राज्यात चमकण्याची परंपरा चांगली आहे. यालाच अनुसरून चालू वर्षी इयत्ता सातवीच्या परीक्षेत शाळेतील पाच मुले जिल्हा गुणवत्ता यादीत चमकली.

याच पार्श्वभूमिवर ग्रामस्थ, पालक यांनी गुरुजींवर खूष होऊन त्यांना चारचाकी भेट देण्याचा निर्णय घेतला व गाडी गावात येताच सरपंच कावेरी नळकांडे, उपसरपंच नानासाहेब रुके, बलराम पतसंस्थेचे मुख्य सचिव विजयराज टेमगिरे, विलास नळकांडे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाराम नळकांडे यांचे हस्ते गाडी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात गुरुजींचा विशेष सन्मान माजी सरपंच सुशीलकुमार रुके, ग्रामपंचायत सदस्या पुनम रुके, अश्विनी नळकांडे, पोलिस पाटील रूपाली टेमगिरे, डॉ.रवींद्र टेमगिरे, धनंजय रुके, अविनाश रुके, बाळू टेमगिरे आदींचे हस्ते करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT