Aafroj Shaikh sakal
पुणे

Snake Bite : चार वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशामुळे मृत्यू, डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचा नातेवाईकांचा आरोप

पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर येथील भोईरवाडी मधील एका चार वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशाने मृत्यू झाला.

पराग जगताप

ओतूर - पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर येथील भोईरवाडी मधील एका चार वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशाने मृत्यू झाला असून, सदर चिमुरडीवर ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी वेळेत उपचार केले नसल्यामुळे तीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. आफ्रोज अमिर शेख (वय-४) रा. भोईरवाडी, पिंपळगाव जोगे, ता. जुन्नर, जि. पुणे असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आफ्रोज शेख ही चिमुरडी सोमवारी ता. २९ रोजी भोईरवाडी येथे आजोबांच्या घरात आईसोबत झोपली होती. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना तिला विषारी सर्प चावला. सर्पदंश झाल्यामुळे तिच्या कुटुंबातल्या सदस्यांनी तिला उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले, मात्र तिथे गेल्यानंतर दवाखान्याचे दरवाजे लावलेले होते असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.

काही वेळानंतर रूग्णालयातील कर्मचाऱ्याने दरवाजा उघडला. त्यावेळी आम्ही मुलीला साप चावला असल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी परिचारिकेने रूग्णालयातून डॉ. विशाल डुंबरे यांना फोन करून माहिती दिली. डुंबरे यांनी सदर मुलीला नागाचा दंश असल्याने तिला उपचारासाठी पुढे नारायणगाव येथे घेऊन जाण्यास फोनवरच सांगितले. त्यानंतर सदर चिमुरडीला नारायणगाव येथे डॉक्टरनी मृत घोषित केले.

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल डुंबरे यांनी रूग्णालयत येऊन मुलीला तपासणी देखील केली नसल्याची तक्रार तिच्या कुटुंबातल्या सदस्यांनी केली असून तिला जर वेळेत उपचार भेटले असते, तर ती वाचली असती असे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. तरी सदर डॉक्टर वर कारवाई करण्याची मागणी मुलीची आई, आजी व आजोबा व इतर नातेवाईकांनी केली आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य व आदिवासी नेते देवराम लांडे यांनी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन सर्पदंश झालेल्या चिमूरडीच्या नातेवाईकांची भेट घेतली. तसेच ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास उपचार करण्यासाठी टाळाटाळ का केली? याबाबत जाब विचारून, ओतूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्याची वरिष्ठ अधिकाऱ्याकडे फोनद्वारे तक्रार केली आहे.

मनसे तालुकाध्यक्ष तानाजी तांबे म्हणाले की सदर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच अशा घटना टाळण्यासाठी ओतूर ग्रामिण रूग्णालय लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

ओतूर वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल डुंबरे म्हणाले सोमवारी मध्यरात्री १.२४ वाजता मी कोर्टर मध्ये झोपलो असताना मला दवाखान्यातून फोन आला की चार वर्ष वयाच्या मुलीला १२ वाजे दरम्यान नाग दंश झाला असून तीला पिंपळगाव जोगा येथून आणले आहे आणि तीला उलटी ही झाली आहे. कमी वय आणि आरोग्य केंद्रात व्हेलटीनेटरची सुविधा नसल्यामुळे मी फोनवरच त्याना पुढे उपचारासाठी न्यावे लागणार असल्याचे सांगितले. तसेच मी हॉस्पिटल मध्ये येईपर्यंत सदर रूग्णाला घेऊन नातेवाईक नारायणगावला गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT