ycm hospital 
पुणे

Coronavirus : निजामुद्दीनहून आलेले पिंपरी-चिंचवडमधील 14 जण रुग्णालयात दाखल

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - दिल्ली येथील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील 32 नागरिक सहभागी झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 14 जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने बुधवारी (ता. 1 ) ‘एनआयव्हीकडे’ तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तर इतर 18 नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात पंधरा दिवसांपूर्वी एक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात 1 हजार 830 जण सहभागी झाले होते. यातील काहीजण कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, यामध्ये  पिंपरी-चिंचवड शहरातीलही 32 लोक सहभागी झाले होते. हे नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात येवून 15 दिवस झाले आहेत. महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. अद्यापपर्यंत 14 जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना महापालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) व भोसरी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने बुधवारी तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

Coronavirus : बीसीजी लस घेतलेल्यांना धोका कमी

या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या नावांची यादी प्राप्त झाली असून त्यानुसार शहरातील नागरिकांचा शोध घेतला जात आहे . अद्यापपर्यंत 14 जणांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले आहे. इतरांचा शोध सुरू आहे. हे लोक किती जणांच्या  संपर्कात आले आहेत, याचीही माहिती घेतली जात आहे.
- श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT