fraud of 1 lakh 25 thousand for asking job in air force  
पुणे

'एनडीए'मध्ये नोकरी लावतो सांगून केली सव्वालाखाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून तरुणाला तेथे एअर फोर्स फ्लाईंग ऑफीसर या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशातील एका तरुणाला सव्वा लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी तिघांविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी नवीन त्रिपाठी (वय 22, रा. उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2015 तल जानेवारी 2019 या कालावधीमध्ये घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुळचे उत्तर प्रदेशमधील आहेत. नोकरी शोधण्यासाठी ते पुण्यात आले होते. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्या. त्या तिघांनी आपण त्यांना तिघेजण एका ठिकाणी भेटले होते. त्यावेळी तिघांनीही आपण "एनडीए'मध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना त्यांची "एनडीए'मध्ये "एअर फोर्स फ्लाईंग ऑफीसर'च्या प्रशिक्षणासाठी निवड झाल्याची बतावणी केली.

वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून त्यांच्याकडून प्रशिक्षण शुल्कापोटी सव्वा लाख रुपये बॅंकेत भरायला सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना प्रशिक्षणाकरीता निवड झाल्याचे पत्र, शुभेच्छापत्र, एनडीएचे माहितीपत्रक, या स्वरुपाची बनावट कागदपत्रे बनवून ती फिर्यादी यांना पोस्टाने पाठवून दिली. फिर्यादी यांनी संबंधीत कागदपत्रांची सत्यता पडताळली. त्यावेळी त्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT