fraud Anganwadi workers for corona vaccine register apron reasons in haveli 
पुणे

कोरोना लस, रजिस्टर, अॅप्रनसाठी होतेय अंगणवाडी सेविकांची लूट

निलेश बोरुडे

किरकटवाडी : अगोदरच कमी, अवेळी मिळणाऱ्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची कोरोना लस व इतर वेगवेगळ्या नावाखाली उघडपणे लुट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार हवेली तालुक्यात सध्या सुरू असून याबाबत हवेली पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांनी  अंगणवाडी सेविकांना सक्ती नसल्याचे सांगितले आहे,मात्र पर्यवेक्षकांकडून प्रत्येक अंगणवाडी सेविकांकडे सक्तीने पैशांची मागणी केली जात असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले आहे. 
  
        
हवेली पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविकांकडे अॅप्रनसाठी प्रत्येकी तीनशे पन्नास रुपयांची मागणी केली जात आहे.त्याची कोणतीही पावती अंगणवाडी सेविकांना देण्यात येत नाही. याअगोदरही अंगणवाडी सेविकांकडून कोरोना लशीसाठी म्हणून प्रत्येकी अठ्ठाविस रुपये घेण्यात आलेले आहेत. तसेच काही नोंदी ठेवण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या रजिस्टरचे पैसेही अंगणवाडी सेविकांकडून उकळण्यात आलेले आहेत.

PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी​
    
अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या महिला सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. अनेक महीलांना इतर आधार नसल्याने याच तुटपुंज्या मानधनावर त्या आपल्या कुटुंबाचा खर्च भागवतात, शिवाय मानधनही वेळेवर मिळेल याची शाश्वती नसते. त्यातच आता वेगवेगळी कारणे सांगून पैसे गोळा केले जात असल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये संतापाची भावना आहे. परंतु वरिष्ठांच्या दबावामुळे व नोकरी जाण्याच्या भीतीमुळे अंगणवाडी सेविका जाहीरपणे बोलणे टाळत आहेत, असे काही अंगणवाडी सेविकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

"यापूर्वी काही कारणांनी अंगणवाडी सेविकांकडे पैसे मागितले गेले असतील तर त्याबाबत माहीती नाही.मी काही महिन्यांपूर्वीच येथे नियुक्तीवर आलो आहे. अॅप्रनसाठी अंगणवाडी सेविकांना सक्ती करण्यात आलेली नाही. सादील खर्चातून अॅप्रनसाठी पैसे देण्यात यावेत व त्याची पावती देण्यात यावी असे पर्यवेक्षकांना कळवले आहे. अद्याप कोणाकडूनही पैसे घेण्यात आलेले नाहीत."
- महेंद्र वासनिक, एकात्मिक बालविकास अधिकारी, पंचायत समिती हवेली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

SCROLL FOR NEXT