fraud with Boy showing the lure of getting a job in the Collector's office 
पुणे

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवकाची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

वालचंदनगर : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील युवकाची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाेकरी लावण्याच्या बहाण्याने बनावट नियुक्तीपत्र देवून 3  लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी सिद्धार्थ देविदास झेंडे, प्रगती सिद्धार्थ झेंडे (रा.दोघे,म्हसोबाचीवाडी), बबन सिताराम दळवी, पुष्पा बबन दळवी (रा.दोघे, डोर्लेवाडी, ता.बारामती) व किरण लव्हाजी मदने (रा.३५ फाटा,ढेकळवाडी ता.बारामती) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी प्रकाश बबन कोळेकर (रा.भवानीनगर) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रकाश कोळेकरे यांचा मुलगा आशिष याचे शिक्षण १३ वी झाले आहे. वरील पाच जणांनी आशिषला पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लिपिक पदावरती नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपयांची मागणी केली होती. साडेसात लाख रुपये देण्याचे ठरले.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

३ फेब्रुवारी २०२० रोजी यातील ५ लाख रुपये रोख स्वरुपामध्ये घेवून मंत्रालयातील लिपिक पदाचे नियुक्तीपत्र देवून ४ मार्च २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितले. मात्र बनावट नियुक्तीपत्र असल्याने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजर करुन घेतले नाही. ७ दिवसानंतर झेंडे याने ऑर्डर काढण्यासाठी २५ हजार रुपये साहेबांना देण्याचे कारण सांगून प्रगती झेंडेच्या खात्यावर ९ मार्च २०२० रोजी पैसे घेतले.

कोळेकर यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी झेंडे याने ५ लाख रुपयांचा व बबन दळवी याने ४ हजार ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. दोन्ही धनादेश बाउन्स झाल्यामुळे कोळेकर यांनी पैशाची वेळोवेळी मागणी केल्यामुळे त्यांना १ लाख ३० हजार रुपये परत दिले असून 3 लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली.  याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी वरील पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT