Mango fraud sakal
पुणे

Mango fraud : ‘तो’ कोकणातील हापूस ‘इल्ला’ ; मार्केट यार्डामध्ये कर्नाटक आंब्यांची विक्री करून फसवणूक

फळ बाजारात काही अडत्यांकडून कोकणातील हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री केली जात आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांची फसवणूक होत असून, बाजार समिती याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : फळ बाजारात काही अडत्यांकडून कोकणातील हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री केली जात आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांची फसवणूक होत असून, बाजार समिती याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातील हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

मार्केट यार्डातील फळबाजारात कोकणातून आठ ते दहा हजार पेट्या, तर कर्नाटकातून दोन ते तीन हजार आंब्यांच्या पेट्यांची आवक होत आहे. बाजारातील काही अडतदार रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री करत आहेत. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होत आहे. या फसवणुकीस आळा बसण्यासाठी तत्कालीन पणन संचालकांनी परिपत्रक काढत फसवणूक करणाऱ्‍या अडत्यांवर आणि व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश राज्यातील सर्व बाजार समित्यांना दिलेला आहे.

राज्यातील बाजार समित्यांच्या फळबाजार आवारात ज्या राज्यातून आंबा आला आहे, त्याच राज्यातील मूळ जातीच्या नावानेच आंब्याची विक्री होईल, याबाबतची दक्षता घ्यावी. बाजार समित्यांना बाजार आवारातील सर्व गाळेधारक अडत्या, व्यापारी, हुंडेकरी यांना याबाबतच्या सक्त सूचना द्याव्यात. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर बाजार समितीचे मंजूर उपविधीतील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करावी, असे पणन संचालकांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

बाजार समितीने यासाठी विशेष पथकाची नेमणूक केलेली आहे. परराज्यातील आंबा कोकण हापूस नावाने विक्री करताना आढळल्यास संबंधित अडत्यावर दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबन करण्यात येईल.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

विभागप्रमुख, गटप्रमुखांचा काणाडोळा

ग्राहकांची फसवणूक करणारे बहुतांश अडतदार हे परराज्यातील आंब्यांची विक्री करत आहेत. मात्र, आंब्याच्या हंगामात अडते आणि विभागप्रमुख, गटप्रमुखांच्या साटेलोट्यामुळे कारवाई केली जात नसल्याची चर्चा बाजारात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT