The fraud of the citizens by serving the service for old age and household chores
The fraud of the citizens by serving the service for old age and household chores 
पुणे

वृद्धांची सेवासुश्रृषा व घरकामाच्या बहाण्याने नागरीकांची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

पुणे : वृद्धांची सेवा-सुश्रृषा व घरकाम करण्यासाठी नोकर पुरविण्याचा बहाणा करुन शहराच्या वेगवेगळ्या भागातील 35 नागरीकांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकास अटक केली. 

विक्रम अत्तार सिंग (वय 32 , रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी हवाई दलामध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने फिर्याद दिली होती. फिर्यादी यांच्या वृद्ध आई-वडीलांची सेवा-सुश्रृषा करण्यासाठी त्यांना नोकराची गरज होती. त्यासाठी त्यांनी एका वेबसाईटवर पाहणी केली. त्यानुसार त्यांना रुद्रसाई एंटरप्रायजेस या कंपनीची वेबसाईट निदर्शनास आली. त्यांनी त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी सिंगने फिर्यादी यांना सुश्रृषा सेविकेचे मानधन व कमिशनपोटीची 26 हजार रुपयांची रक्कम आरएस एंटरप्रायजेस नावाच्या बॅंक खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी रक्कम भरली. मात्र सेविका घरी न आल्याने अधिकाऱ्याने संबंधीत मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सायबर गुन्हे शाखेकडे फिर्याद दिली. सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राधिका फडके, जयराम पायगुडे, पोलिस उपनिरीक्षक सागर पडवळ, राहूल हंडाळ, शिरीष गावडे, संतोष जाधव व शितल वानखेडे यांनी तपासाला सुरवात केली. 

तांत्रिक तपास केल्यानंतर संबंधीत फसवणूकीचा प्रकार सिंग या व्यक्तीने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्यास सापळा रचून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली, त्यावेळी त्याने आतापर्यंत तब्बल 35 जणांची याच पद्धतीने फसवणूक केल्याचे कबूल केले. दरम्यान त्याच्याकडून चार मोबाईल, एक डेबीट कार्ड असा ऐवज जप्त करण्यात आला. 
 

या प्रकरणातील आरोपी विक्रम सिंग याने घरकामासाठी नोकर पुरविण्याच्या बहाण्याने आणखी बऱ्याच नागरीकांची फसवणूक केली असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अशा पद्धतीने फसवणूक झालेल्या नागरीकांनी पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT