Pune Market Yard  sakal
पुणे

Pune Market Yard : मार्केट यार्ड मध्ये डमी आडत्यांचा सुळसुळाट ; डमीवर मंगळवारपासून कारवाई

प्रतिज्ञापत्र सादर न करणाऱ्या अडत्यांकडून (ता. १) मंगळवारपासून हजार रुपये दंड घेण्यात येणार आहे.

प्रवीण डोके @pravindoke007

मार्केट यार्ड : डमी अडत्यांना चाप लावण्यासाठी बाजार समिती संचालक मंडळाने पावले उचलला होती. गाळ्यासमोरील मदतनिसांबाबत अडत्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सुरुवात केली आहे. ३१ जुलैपर्यंत १८ अडत्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

तसेच प्रतिज्ञापत्र न सादर न करणाऱ्या अडत्यांकडून (ता. १) मंगळवारपासून हजार रुपये दंड घेण्यात येणार आहे.

मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागातील अडते अखेर पुणे बाजार समिती प्रशासनापुढे नरमले असल्याचे पाहायला मिळत आहे. फळ, भाजीपाला विभागात डमी आडत्यांचा सुळसुळाट झाला आहे.

त्यामुळे दुबार विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. या परिस्थितीमुळे नवनिर्वाचित संचालक मंडळ ॲक्शन मोडमध्ये आहे.

संचालक मंडळाने सुरूवातीला बाजाराची विक्रीची वेळ निश्‍चित केली. त्यानंतर दोनच डमी असल्याचे लिहून देण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र, यास अडत्यांनी विरोध केला होता.

बाजार समितीने ठरवून दिलेल्या वेळेत एकाही अडत्याने प्रतिज्ञापत्र दिले नव्हते. याबाबतचे सकाळ ने बातमी प्रसिध्द केली होती. त्यानुसार ३१ जुलैपर्यंत १८ अडत्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत.

किरकोळ होत चाललेला बाजार घाऊक राहावा. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा. यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रतिज्ञापत्र सादर न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत संबंधित विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारपासून (ता. १) हजार रुपये दंड घेण्यात येणार आहे. यामध्ये डमी अडत्यांना चाप लागणार आहे.

- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Crime : 5 हजार रुपयांचं विष अन् खाकी वर्दीला काळिमा! प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून मिल्कशेक पाजून लेकीनंच पोलिस बापाला संपवलं

ललित प्रभाकरने कुशल बद्रिकेची केली हटके हेअरस्टाईल, अभिनेता म्हणाला...'यामुळे आम्ही खास मित्र झालो' Viral Video

Viral Video : पेट्रोल पंपावर बाईक सोडून, पठ्ठ्या फक्त टाकी घेऊन आला; जुगाड पाहून साऱ्यांनी डोक्याला हातच लावला...

रात्रभर पुरेशी झोप घेऊनही सकाळी चेहरा सुजलेला दिसतो? असू शकतं गंभीर 'या' आजाराचं सुरुवातीचं लक्षण, कधीही दुर्लक्ष करू नका

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गला गारपिटीचा तडाखा; कणकवली, वैभववाडीत आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT