Crime news  esakal
पुणे

Pune Fraud : जादा दराने हिरे विक्री करून महिलेची साडेतीन कोटींची फसवणूक

पुणे शहरात लक्ष्मी रस्त्यावरील एका हिऱ्यांच्या दागिन्यांच्या शोरुममध्ये प्रकार उघडकीस आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कमी किमतीचे हिऱ्याचे दागिने जास्त दराने विक्री करून एका महिलेची सुमारे साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना लक्ष्मी रस्त्यावरील एका हिऱ्यांच्या दागिन्यांच्या शोरुममध्ये घडली.

या संदर्भात लोणी काळभोर येथील एका महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सेल्समन चेतन विसपुते, संगीता महाजन, तेजल पवार, अमोल मोहिते, सागर धोंडे, चंदन गुप्ता, धवल मेहता, हितेश पुनमिया अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विसपुते याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने लक्ष्मी रस्त्यावरील तनिष्क शोरुममधून वेळोवेळी ४ कोटी १९ लाख रुपयांचे हिऱ्यांचे दागिने खरेदी केले होते. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी हे हिऱ्यांचे दागिने बदलून दुसरे दागिने घेण्यासाठी शोरुममध्ये गेल्या होत्या.

त्यावेळी त्यांना काही कारणे सांगून दागिने न बदलण्याचा आग्रह धरला. त्यांनी बऱ्याचदा फोन करूनही त्यांना प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्यांनी याच कंपनीच्या दुसऱ्या शोरुममध्ये ते हिऱ्याचे दागिने दाखविले. तेव्हा त्यांच्याकडील हिऱ्याचे दागिने हलक्या दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले. त्यांना कमी किमतीचे हिऱ्याचे दागिने जास्त किमतीत दिले.

जादा रकमेचे बनावट बिल तयार करुन त्यावर कंपनीचा शिक्का मारुन डिस्काऊंट दिल्याचे भासविले. अशा प्रकारे तीन कोटी ४८ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केली. कंपनीने शोरूमध्ये नेमलेल्या व्यवस्थापक आणि काही कर्मचाऱ्यांनी ही फसवणूक केल्याची माहिती तपासात समोर आली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT