crime news crime news
पुणे

Pune : सोसायटीच्या कर्मचाऱ्यांकडून चार लाख रुपयांची फसवणूक

ऑक्‍टोंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत ही घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शंकरशेठ (shankarsheth) रस्त्यावरील एका सहकारी गृहरचना संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीच तीन लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोसायटीच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध स्वारगेट पोलिस (swarget police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरीफ अब्दुल रज्जाक शेख (वय 38, रा. साईबाबानगर, कोंढवा), नवनाथ महादेव गायकवाड (वय 47, रा. शुक्रवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी आनंद पार्क सोसाटीचे अध्यक्ष पंडीतराव हरी पाटील (वय 70) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऑक्‍टोंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा आनंद पार्क सोसायटीमध्ये पंप ऑपरेटर म्हणून तर गायकवाड हा वरिष्ठ कारकून म्हणून सोसायटीच्या कार्यालयात काम करीत होते. सोसायटीचा देखभाल खर्च व रंगरंगोटी शुल्क आकारणीची व बॅंकेसंदर्भातील कामे देखील दोघेच करतात. या कामासाठी दोघांना कामासाठी सहा लाख एक हजार रूपये दिले होते. त्यापैकी शिल्लक राहिलेले तीन लाख 90 हजार रूपये या दोघांनी सोसायटीच्या खात्यावर जमा न करता सोसायटीची फसवणूक केल्याचे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहली भारत सोडून लंडनमध्ये का राहतो?; RCB स्टारच्या सहकाऱ्याने सांगितलं कारण म्हणाला त्याला...

कोकणात 'या' ठिकाणी झालंय सई ताम्हणकरच्या 'तुंबाडची मंजुळा'चं शूटिंग; कलाकारांनीच सांगितलं गावाचं नाव

Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फूस लावून अल्पवयीन मुलीचं अपहरण, नंतर अत्याचार अन्...; कसा लागला शोध?

Headmaster Bribery Case : नांदेडमध्ये खळबळ! बदली करण्यासाठी लिपिकाकडे मागितली 50 हजारांची लाच; मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात, अंगझडतीत काय काय सापडलं?

Jamun Benefits : हंगामातील छोटं फळ, पण फायदे मोठे! जांभळाच्या सेवनाने मधुमेह ते वजन राहू शकते नियंत्रणात; बाजारात 300 रुपये किलोने विक्री

SCROLL FOR NEXT