fraud
fraud 
पुणे

सहलीचा बहाणा करून 24 जणांची फसवणूक 

सकाळवृत्तसेवा

पुणे - सहलीच्या नावाखाली 24 नागरिकांकडून सव्वापाच लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

औंध येथील 70 वर्षीय नागरिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिरीष खेडेकर (रा. रानडेवाडा, सदाशिव पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा प्रकार ऑगस्ट 2018 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये घडला. फिर्यादीला सहलीसाठी जायचे होते. त्या वेळी खेडेकर हा त्यांच्या संपर्कात आला. त्याने फिर्यादीला 32 हजार रुपयांमध्ये अंदमान व निकोबार येथे सहलीला नेण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीसह त्याने आणखी 23 जणांकडून प्रत्येकी 32 हजार असे एकूण पाच लाख 28 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने ऐनवेळी विमानाची तिकिटे मिळाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने संबंधितांना पैसे परत करण्याचे आश्‍वासन दिले. फिर्यादीने सतत पाठपुरावा केल्यानंतर त्याने त्यांना आठ हजार रुपये दिले. उर्वरित 24 हजार रुपये दिले नाहीत. फिर्यादी व इतरांची एकूण पाच लाख 28 हजार रुपयांची फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक सी. एम. सूर्यवंशी तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT