pune
pune  sakal
पुणे

Fraud News : आईची बनावट सही करून मुलाने केली सदनिकेची परस्पर विक्री

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आईच्या नावावर असलेल्या सदनिकेची बनावट सहीद्वारे मुलाने परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आईची फसवणूक करणाऱ्या मुलाविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत पृथ्वीराज चव्हाण (रा. सोमवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत जयश्री पृथ्वीराज चव्हाण (वय ६८, रा. महंमदवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री चव्हाण यांचे पती शासकीय सेवेत होते. २००६ मध्ये त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्या मुलगा प्रशांत आणि सूनेसह धनकवडी भागात राहात.

स्वतःच्या दैनंदिन खर्चासाठी त्या पतीच्या निधनानंतर मिळणारे सेवानिवृत्ती वेतन वापरत. दरम्यानच्या काळात त्याचा प्रशांतशी वाद झाला. त्यामुळे त्या त्यांच्या विवाहित मुलीकडे महंमदवाडी येथे राहायला गेल्या होत्या.

त्यानंतर काही महिन्यांनी चव्हाण यांना दुर्धर आजाराने ग्रासले. त्यामुळे २०१८ मध्ये त्यांनी बक्षीसपत्र करून त्यांची सदनिका मुलीच्या नावावर केली. प्रशांत याला ही माहिती समजल्यानंतर त्याने सदनिका भाड्याने दिली. त्यानंतर काही दिवसांनी त्याने आईची बनावट सही करून सदनिका परस्पर एका व्यक्तीला विकली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PN Patil Death: झुंज अपयशी! करवीरचे आमदार पी.एन पाटील यांचे निधन

फॉर्म 17C नुसार मतदानाची आकडेवारी जाहीर केल्यास मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होईल; ECI चे सुप्रीम कोर्टात शपथपत्र

Shah Rukh Khan Health Update: आता कशी आहे शाहरुखची तब्येत? जुही चावलानं दिली हेल्थ अपडेट

Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला द्या अशा हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक भारी मेसेज

आजचे राशिभविष्य - 23 मे 2024

SCROLL FOR NEXT