fraud sakal
पुणे

Pune Fraud : व्यापाऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले; उधार घेतलेला माल परस्पर विकून दोघेजण परराज्यात पसार

‘आमचा किराणा भुसार माल विक्रीचा व्यवसाय बहुतांश उधारीवरच चालतो. परंतु दोन विक्रेत्यांनी उधारीची रक्कम न देता किराणा माल दुसऱ्यालाच विकून ते परराज्यात गेले पळून.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘आमचा किराणा भुसार माल विक्रीचा व्यवसाय बहुतांश उधारीवरच चालतो. परंतु दोन विक्रेत्यांनी उधारीची रक्कम न देता किराणा माल दुसऱ्यालाच विकून ते परराज्यात पळून गेले. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले. पोलिसांनी आम्हाला मदत न केल्यास कोणाकडे दाद मागणार?’ मार्केट यार्डमधील व्यापारी ‘सकाळ’शी बोलताना त्यांची व्यथा सांगत होते.

शहरातील काही ठोक व्यापाऱ्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना उधारीवर मालाचा पुरवठा केला जातो. हा व्यवहार वर्षानुवर्षे सुरळीतपणे सुरू आहे. मात्र, उधारीची रक्कम परत न करता परस्पर दुसऱ्याच व्यापाऱ्याला माल विक्री करून दोघेजण परराज्यात पसार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

एका प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास केला. गुन्हे शाखेतील पोलिसांचे तपास पथक राजस्थानला गेले. परंतु पोलिस त्या गावात पोचेपर्यंत आरोपी तेथून पसार झाले. तर, अन्य एका प्रकरणात मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. परंतु गुन्हा दाखल झालेला नाही, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.

बाजारातील स्पर्धेमुळे नाइलाजाने छोट्या विक्रेत्यांना उधार व्यवहार करावा लागतो. एखादा विक्रेता माल परस्पर विकून पळून गेल्यास वर्षभरात होणारा नफा त्यातच गेल्याने निराश व्हावे लागते. पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले.

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर माल खरेदीच्या पावत्या, कोणत्या वाहनांतून माल घेतला, त्या वाहनांचा क्रमांक, चलन, तसेच विक्रेत्याला उधार माल दिल्याचा तपशील, वसूल झालेली रक्कम, बॅंकेचे स्टेटमेंट अशी माहिती पोलिसांना द्यावी लागते. या बाबींची पूर्तता करूनही गुन्हा दाखल झालेला नाही.

पोलिसांवरही मर्यादा

परराज्यात आरोपींपर्यंत पोचण्यापूर्वीच त्यांना पोलिस येणार असल्याची कुणकूण लागते. त्यामुळे आरोपी पसार होतात. परराज्यांतील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांवरही मर्यादा येत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

व्यापाऱ्यांनी उधार दिलेल्या मालाचे पैसे वसूल करून देणे हे पोलिसांचे काम नाही. व्यापारी त्यांचे आर्थिक व्यवहार करीत असतात. व्यापाऱ्यांनी असे व्यवहार करताना दक्षता घ्यावी. जेणेकरून यापुढे त्यांची फसवणूक होणार नाही.

- आर. राजा, पोलिस उपायुक्त, परिमंडळ पाच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT