तब्बल ९२१ दिव्यांग, ज्येष्ठांना मिळणार आधार
पाचवडला १७ सप्टेंबरला साहित्य वितरण शिबिर; आमदार डॉ. भोसलेंचा पुढाकार
मलकापूर, ता. १३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. १७) पाचवड फाटा (ता. कऱ्हाड) येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विनाशुल्क साहित्य वाटप शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात तब्बल ९२१ पात्र दिव्यांग व ज्येष्ठांना कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते विविध सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात येईल.
आनंद मल्टिपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभाग योजनेंतर्गत डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार डॉ. भोसलेंच्या पुढाकाराने जुलैमध्ये कोयना वसाहतीत दिव्यांग व ज्येष्ठांसाठी तपासणी शिबिर घेतले होते. त्यातील ९२१ पात्र लाभार्थ्यांना आमदार डॉ. भोसले यांच्या विशेष प्रयत्नामुळे तब्बल ८०.७८ लाख रुपयांचे विविध सहाय्यभूत साहित्य मंजूर झाले आहे. यात व्हीलचेअर, व्हीलचेअर विथ कमोड, काठी, कानाचे मशिन, कंबरपट्टा, गुडघ्याचा पट्टा, नेक बेल्ट, स्मार्ट फोन, पाठीचा पट्टा, कमोड चेअर अशा साहित्याचा समावेश आहे.
या साहित्याचे वितरण पात्र दिव्यांग व ज्येष्ठांना गुरुवारी पाचवड फाटा येथे सकाळी दहा वाजता करण्यात येईल. कार्यक्रमाला येताना पात्र लाभार्थ्यांनी मूळ आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
.................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.