पुणे

गर्भवतींसाठी पालिकेकडून स्वतंत्र रुग्णवाहिका

सकाळवृत्तसेवा

पुणे - प्रसूतीच्या काळात गर्भवतींना रुग्णालयात उपचाराकरिता ये-जा करता यावी, यासाठी दोन स्वतंत्र रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) सुरू करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या योजनेसाठी एकाच टप्प्यात ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रुग्णवाहिकेत प्रसूतितज्ज्ञ आणि अन्य यंत्रणाही उपलब्ध होईल. महापालिकेने प्रथमच सुरू केलेल्या योजनेमुळे गरीब व गरजू घटकांतील महिलांना दिलासा मिळणार आहे. 

 एरवी एकमेकांचे प्रस्ताव हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकांनी योजनेचे कौतुक करीत, तिची व्याप्ती वाढविण्याची मागणी केली. शहराच्या पूर्व भागासाठी विशेषत: हडपसरकरिता ही रुग्णवाहिका उपलब्ध करावी ही योगेश ससाणेंची उपसूचना मान्य केली. महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये गर्भवतींना येणाऱ्या अडचणींकडे ‘सकाळ’ने ‘ती’च्या कळा’ या वृत्तमालिकेद्वारे लक्ष वेधले होते. त्यानंतर महापालिका आवश्‍यक त्या सुविधा पुरवित आहे. प्रसूतीदरम्यान तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी प्रसूतिगृहांत ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’ची सोय करण्यात आली. 

महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले आणि वृषाली चौधरी यांनी रुग्णवाहिकेचा मांडलेला प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. या योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्याचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. 

रुग्णवाहिकेत या सुविधा असतील 
प्रसूतितज्ज्ञ
माता आणि बाळासाठी सोय
महिला चालक, अटेंडन्ट
परिचारिका
प्रसूतीआधीची आवश्‍यक यंत्रणा
या सेवेसाठी संपर्क यंत्रणा

 प्रसूतीच्या काळात गर्भवतींची रुग्णालयात ने-आण करण्यासाठी रुग्णावाहिकेची व्यवस्था आहे. ती सेवा मोफत राहणार असून, सर्व गरजू महिलांना ती उपलब्ध असेल.
राजश्री नवले, अध्यक्ष - महिला व बालकल्याण समिती, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT