पुणे

महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

CD

महिलांसाठी मोफत
कॅन्सर तपासणी शिबिर
अहिल्यानगर, ता. २९ ः महिलांमध्ये वाढत्या कॅन्सरच्या आजारांवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी सावेडी येथील अपंग संजीवन सोसायटीच्या मूकबधिर विद्यालय, तसेच डी. बी. फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी रविवारी (ता. एक) सकाळी अकरा वाजता मोफत कॅन्सर तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यालयाच्या ज्येष्ठ संचालिका विद्या भावले यांनी दिली.
सावेडीतील अपंग संजीवनी सोसायटी संचलित, मूकबधिर विद्यालय व वसतिगृहात हे शिबिर होणार आहे. मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या व सध्या विखे मेमोरियल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे कार्यरत असलेल्या कर्करोगतज्ञ डॉ. प्रियंका पठारे या प्रमुख मार्गदर्शन व व्याख्यात्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या किरण बारस्कर आणि डॉ. अश्विनी बोरुडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. आधुनिक काळात महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. या शिबिरात आरोग्यविषयक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. कॅन्सरची प्राथमिक लक्षणे व ओळख, कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावीत, जेणेकरून आजार बळावण्यापूर्वीच त्यावर उपचार करणे शक्य होईल. प्रतिबंधात्मक उपाय व आधुनिक उपचार पद्धती, कॅन्सरपासून बचाव कसा करावा आणि वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपचार पद्धतींची माहिती स्त्री-आरोग्य व जीवनशैली महिलांच्या आरोग्याशी संबंधित इतर आजार, आहार, व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Latest Marathi News Update: कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत होणार

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

SCROLL FOR NEXT