पुणे

श्री काशीलिंग सामुदायिक विवाह सोहळ्याचे सलग बाराव्या वर्षी आयोजन ; 19 एप्रिल रोजी होणार अक्षता सोहळा

CD

बारा वर्षांपासून विवाह सोहळ्यातून समाजसेवा
श्री काशीलिंग बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम; यंदा १९ एप्रिलला अक्षता
सकाळ वृत्तसेवा
जेऊर, ता. १ : अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे श्री काशीलिंग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या १२ वर्षांपासून मोफत विवाह सोहळ्यातून समाजसेवा केली जात आहे. यंदा १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.४५ वाजता अक्कलकोट रोडवरील श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू विवाह इच्छुक जोडप्यांनी लवकर नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे सदस्य अंबराया कनोजी यांनी केले.
या सोहळ्यास विविध मठाधीश व धार्मिक मान्यवर उपस्थित राहणार असून, सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दुष्काळ, महागाई व वाढत्या लग्नखर्चामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेने गेल्या १२ वर्षांपासून (कोरोना काळ वगळता) सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन सुरू ठेवले आहे. आतापर्यंत २५५ जोडपी विवाहबद्ध झाली असून, यंदा अधिक जोडप्यांचे विवाह त्यांच्या धर्माच्या रीतिरिवाजांनुसार लावण्याचे नियोजन आहे. इच्छुकांनी काशिनाथ कडगंची (८३०८३५४२०४) व इरण्णा कणमुसे (९४२३७८७२५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वधू-वरांना पोशाख, मणी-मंगळसूत्र, मिरवणूक, भोजन व शिदोरी यांची मोफत व्यवस्था केली जाणार आहे. दरवर्षी सुमारे ५० हजार वऱ्हाडी उपस्थित राहतात. या सोहळ्याचे नियोजन काशीलिंग देवस्थान ट्रस्ट, बहुउद्देशीय संस्था, कार्यकर्ते व ग्रामस्थ करत आहेत.
पत्रकार परिषदेस शिवाजीराव कलमदाणे, काशिराया पाटील, इरण्णा कणमुसे, दत्तात्रय कवठे, मल्लिनाथ चौलगी, सिद्धाराम कापसे, राजकुमार अमोगी, काशिनाथ पाटील, शंकर अजगोंडे, श्रीशैलय्या मसुती, इरण्णा चपळगाव, काशिनाथ कडगंची, शिवराज बोरिकरजगी, सुभाष पाटील, नागनाथ कापसे आदी उपस्थित होते.
---
चौकट
सोहळ्यात होणार यांचा सन्मान
दरवर्षीप्रमाणे सामुदायिक विवाह सोहळ्यातील वेगळा उपक्रम म्हणून अक्कलकोट तालुक्यातील निरंतर वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या ५० वर्षे वयांवरील डॉक्टरांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच संघर्षातून कुटुंब सावरून सामाजिक उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान भगिनींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

Shocking: दुर्दैवी! चालत्या स्कूल बसची फरशी अचानक तुटली; चिमुकली पडून चाकाखाली आली अन्...; भावासमोरच करूण अंत

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील नियुक्त्या अवैध; पगार वसुलीचे निर्देश, फाइल, आदेश नसलेल्या शिक्षकांवर कारवाई

Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी नाशिक सज्ज! १० हजार स्वयंसेवक आणि होमगार्ड्स सांभाळणार भाविकांच्या सुरक्षेची धुरा

US, Israel war on Iran : इस्त्रायल- इराण युद्धाचा फटका, पुण्यातून दुबईसाठी विमान सेवा २ दिवस राहणार बंद, अनेक प्रवासी अडकले

SCROLL FOR NEXT