Ration Card Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात रेशनवर २४ हजार टन धान्याचे मोफत वितरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मे महिन्यात प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर आणि जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांमार्फत (Ration Shop) मे महिन्यात आजअखेर सुमारे २४ हजार टन धान्य मोफत वितरित (Grain Free Distribute) करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकार (State Government) यांच्याकडून प्रत्येकी सहा किलो गहू आणि चार किलो तांदूळ देण्यात आला आहे. उर्वरित लाभार्थ्यांना (Beneficiaries) महिनाअखेरपर्यंत धान्य वितरण करण्यात येणार आहे. (Free distribution of 24000 tons of foodgrains on ration in Pune district)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मे महिन्यात प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. तसेच, केंद्र सरकारच्या वतीनेही मे आणि जून या दोन महिन्यांत प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे.

Grains

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी शिधापत्रिकाधारकांना धान्य वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही योजनांचे धान्य महामंडळाच्या गोदामातून रेशन दुकानांमध्ये पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्हीडिओ कॉन्फरन्समार्फत लाभार्थ्यांना धान्य वेळेत वाटप करण्याबाबत तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या कालावधीत लाभार्थ्यांना नियमांचे पालन करून धान्य वितरित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.

अन्नसुरक्षा योजना (पुणे, पिंपरी चिंचवड शहर)

  • शिधापत्रिकाधारक - ३,०१,८८६

  • लाभार्थी - १२,४३,१४८

  • पुणे जिल्हा ग्रामीण

  • शिधापत्रिकाधारक - ५,३२,०००

  • लाभार्थी - २४,७१,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

Samsung Galaxy S24 Ultra मोबाईलवर चक्क 70 हजारचा डिस्काउंट; प्रीमियम ऑफर पाहा एका क्लिकवर

Political Astrology : अजित पवारांच्या मागची साडेसाती कधी संपणार? या महिन्यात होणार मोठा राजकीय बदल, जाणून घ्या भविष्य....

Asia Cup, IND vs PAK: मोदींना शेवटची संधी होती..उद्धव ठाकरे खवळले, महिला शिवसैनिक पंतप्रधानांना सिंदूर पाठवणार!

Latest Marathi News Updates : कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे कांग्रेस विरोधात आंदोलन

SCROLL FOR NEXT