पुणे

आळे येथे १७८ नागरिकांची नेत्र तपासणी

CD

आळेफाटा, ता. २३ : आळे (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन, पुणे, शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल, सुवर्णयुग युवा मंच, आळे तसेच ज्येष्ठ नागरिक संघ- आळे, संतवाडी व कोळवाडी यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरामध्ये एकूण १७८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८७ नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथे रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे या शिबिरासाठी पारनेर, संगमनेर व अकोले तालुक्यामधूनही नागरिकांनी उपस्थिती लावली.
दरम्यान, डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात गेल्या दोन वर्षांत पाच हजारांपेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत व यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत रुग्णांना नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास व निवास व्यवस्था, जेवण चष्मा, एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत दिल्या जात आहेत. तसेच तिरळेपणावरील शस्त्रक्रियादेखील मोफत करण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले.
याप्रसंगी शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डॉ. ओंकार पाटील व त्यांची संपूर्ण वैद्यकीय टीम, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके, उपाध्यक्ष किसन जाधव, सचिव शिवाजी कुऱ्हाडे, सहसचिव नामदेव दिघे, माजी सैनिक जालिंदर माळी, सखाराम कुऱ्हाडे, नागेश कुऱ्हाडे, किसन बहिरट, हिरूजी कुऱ्हाडे, पांडुरंग गाढवे, योगेश वाघचौरे, आशा सेविका आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

लखनौचा कायापालट! ४५ मिनिटांचा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत; पाहा योगींचा 'ग्रीन' प्लॅन!

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा आले २ हजार रुपये! PM मोदींनी जारी केला २२ वा हप्ता; यूपीच्या शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस!

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

SCROLL FOR NEXT